भुजबळांचा फडणवीसांना टोला, ‘एक शरद... सगळे गारद’ हेच योग्य...

भुजबळ म्हणाले, 'शरद पवार यांनी शब्दच्छल करणाऱ्यांना गारद केले आहे. त्यामुळे 'एक शरद, सगळे गारद' हेच शीर्षक योग्य आहे.'
2fadanvis_bhujbal_final.jpg
2fadanvis_bhujbal_final.jpg

पुणे : शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा ‘एक शरद..सगळे गारद’ हा प्रोमो नुकताच प्रसिध्द झाला आहे. त्यावर बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचा नाव न घेता ‘एक नारद..शिवसेना गारद’ असा टोला काल लगावला होता. याला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. ‘एक शरद... सगळे गारद’ हेच प्रोमोचे नाव योग्य असल्याचे सांगत भुजबळ यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर टिका केली आहे. यावर भुजबळ म्हणाले, 'शरद पवार यांनी शब्दच्छल करणाऱ्यांना गारद केले आहे. त्यामुळे 'एक शरद, सगळे गारद' हेच शीर्षक योग्य आहे.'
 
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल जळगाव जिल्हा कोविड रूग्णालयास भेट देली. पत्रकारांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कि शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा एक प्रोमो प्रसिध्द झाला आहे. त्यात ‘एक शरद..सर्व गारद’ असे म्हटले आहे. त्याचा अर्थ उध्दव ठाकरे ही गारद असा आहे का? याच मुलाखतीबाबत मला एक मेसेज आला आहे. संजय राऊत यांच्या एका मुलाखतीला नाव ‘एक नारद..शिवसेना गारद’ असे हवे होते, असा टोलाही  देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता.
  

सध्या राज्यात ‘कोरोना’ची गंभीर परिस्थिती असतांना सत्तेतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांच्या फोडाफाडीच्या होत असलेल्या राजकारणावरही त्यांनी टिका केली, ते म्हणाले, सद्यस्थितीत ‘कोरोना’वर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असतांना सत्तेतील तीनही पक्ष फोडाफोडीचे राजकारण करीत आहे. हे योग्य नाही. आम्ही अशा राजकारणाकडे लक्ष देत नाही. आम्ही सद्यस्थितीत केवळ ‘कोरोना’विरूध्द लढाईकडे लक्ष केंद्रीत केले
आहे.
  
‘सामना’वर टीका करतांना ते म्हणाले, कि सामना आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आणि तत्वांचा राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही सामनाच्या टिकेला महत्व देत नाही, उत्तरही देत नाही. सध्या हा सामनाकॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचारांचा झाला आहे. ‘कोरोना’च्या बाबतीत बोलतांना फडणवीस म्हणाले, ‘कोरोना’ रोगासंदर्भात आपण सर्वच ठिकाणी पाहणी करीत आहोत. याचे मोठे प्रॉब्लेम आहेत, रूग्णांना बेड मिळत नाही. त्यांच्या उपचार वेळेवर केले जात नाही. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्याची गरज आहे. मात्र तेवढ्या प्रमाणात चाचण्या होत नाहीत. शासनाने मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्याची गरज आहे. 
  
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com