भीमाशंकर मंदिर  श्रावण महिन्यातही बंद राहणार..

बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार श्रावण महिन्यातही बंद राहणार आहे.
4 (5).jpg
4 (5).jpg

शिनोली (पुणे ) :  कोरोना विषाणूच्या महामारीमुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार श्रावण महिन्यातही बंद राहणार आहे. त्यामुळे देशातील भाविकांनी व विषेशतः पुणे जिल्ह्यातील नागरिकांनीही भीमाशंकराचे दर्शन घेण्यासाठी येऊ नये, असे आवाहन भीमाशंकर देवस्थानचे  विश्वस्त मधुकर  गवांदे यांनी केले आहे. 

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली  होती. यावेळी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, यावेळी देवस्थान विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडीलकर, दत्ता कौदरे, गोरक्षनाथ कौदरे उपस्थित होते.

श्रावणमास सुरू झाला आहे.  श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी भरणारी श्रावण महिन्यातील यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली.   त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये. तसेच खेड, आंबेगाव व इतर जवळील तालुक्यातील नागरिकांनीही दर्शन व्हावे यासाठी आग्रह करू नये.  पोलीस प्रशासनाने ब्लु मॉरमॉन हॉटेल कडून येणारा रस्ता व  पोखरी घाटाने येणारे नागरिक या दोन रस्त्यांनी येत आहे. यासाठी दोन्ही रस्ते ज्या ठिकाणी एकत्र होतात तेथील पालखेवाडी येथे बंदोबस्त नेमावा, अशी सुचना यावेळी मधुकर गवांदे यांनी केली.

डिंभे, पालखेवाडी व श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पोलिसांनी चेकपोस्ट उभारले आहे. त्यामुळे या भागात श्री क्षेत्र भीमाशंकराचे दर्शन व पर्यटनासाठी आढळून आल्यास संबंधिताची गाडी जप्त करून कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल  करणार आहे. त्यामुळे येणा-या भाविकांनी व पर्यटकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा येणा-यांवर कायदेशीर कारवाई  केली जाईल, असे  सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी  सांगितले. 

हेही वाचा :  पुणे परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी राजेंद्र जगताप 
 
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी पुणे महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची आज (ता. २४ जुलै) नियुक्ती करण्यात आली. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकरी व आधिकाऱ्यांच्या समन्वयातून पीएमपीएमएलची अधिक चांगली सेवा देण्याबरोबरच ही संस्था अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी भावना जगताप यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केली.  जगताप यांनी पदाची सूत्रे शुक्रवारी (ता. २४ जुलै) दुपारी घेतली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com