आमदार राजेंद्र राऊतांचे हातपाय तोडण्याची धमकी देणारा `मुंबईबाबा` कोण?

धमकी देणाऱ्या 'मुंबईबाबा' नावाच्या गुंडाला अटक करावी, आमदार राऊत यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
raut8.jpg
raut8.jpg

मुंबई : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबूक लाइव्हवरून धमकी देण्यात आली आहे. या विषयावर आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला जाब विचारला. धमकी देणाऱ्या 'मुंबईबाबा' नावाच्या गुंडाला अटक करावी, आमदार राऊत यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "नंदू ऊर्फ बाबा चव्हाण नावाचा गुंड आहे. तो स्वतःला 'मुंबईबाबा' समजतो. त्याने आमदार राजेंद्र राऊत यांना धमकी दिली आहे. त्याने एका सत्ताधारी पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षाचा नावाचा उल्लेख करून त्यांच्या केसाला धक्का लागला तर आम्ही राजेंद्र राऊत यांचे दोन्ही हात तोडून टाकू, अशी धमकी दिली आहे. ''राजेंद्र राऊत तुम्ही संरक्षण घेतलं असलं तरी पोलिसमध्ये आमचं लोक आहेत," अशी धमकी अधिवेशन सुरू असताना त्याने फेसबूक लाइव्ह करून दिली आहे. 

"आमदार कुठल्याही पक्षाचा असू द्या, अधिवेशन सुरू असताना एका आमदाराला फेसबूक लाइव्हवरून गावगुंडाची धमकी देण्य़ाची हिमंत होत असेल तर या विधानसभेचे काही अर्थ उरणार नाही. गृहमंत्र्यांनी या गावगुंडाला आजच्या आज अटक केली पाहिजे. राऊत यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.  


हेही वाचा : 'खुर्चीला चिकटलं की, तुम्ही कोण अन् आम्ही कोण ? 

मुंबई : "दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी एके दिवशी मुंबईत आलेले असताना त्यांचा निरोप मला आला. त्यांनी भेटायला बोलावले होते. मी आणि आदित्य गेलो. तेव्हा, शिवसेनाप्रमुखांमुळे मी राष्ट्रपती झालो आणि आता माझा कार्यकाळही संपायला आला आहे. ऋण व्यक्त करायला आज शिवसेनाप्रमुख नाहीत. तरीही त्यांच्या मुलाला भेटून ऋण व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला आज बोलावले आहे, असे प्रणवदा म्हणाले. इतक्या मोठ्या मनाचे प्रणवदा होते," असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधानसभेत शोक प्रस्तावावर बोलताना म्हणाले. "नाही तर एकदा खुर्चीला चिकटले की, तुम्ही कोण अन् आम्ही कोण, असा प्रवृत्तीचे लोक आहेत," असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता लगावला. `मातोश्री`ला आले असताना शिवसेनाप्रमुख आणि प्रणवदा बोलत होते. मी त्यांना बघतच होतो. अतिशय संवेदनशील माणूस आणि आब राखून बोलण्याची त्यांची शैली होती. त्यानंतर राष्ट्रपती भवनात आम्ही एनडीएला मोदींना पाठिंबा दर्शवायला गेलो होतो. तेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं नव्हतं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com