धक्कादायक : निवडणुकीत मदत केली नाही म्हणून युवकाचा खून .. - Ballur Gram Panchayat youth Murder not helping in the election | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : निवडणुकीत मदत केली नाही म्हणून युवकाचा खून ..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 मार्च 2021

ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून युवकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार देगलूर तालुक्यात घडला आहे.

नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून युवकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार देगलूर तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आठ आरोपींना अटक ही केली आहे. सध्या बल्लूर मध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे.

नांदेड जिल्ह्यात "ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला मदत केली असती तर आमचा सरपंच झाला असता," असं म्हणत दहा जणांनी मिळून एका 22 वर्षाच्या तरुणावर लोखंडी, राँड, विटकर आणि लाठ्या काठ्याचा वापर करत हल्ला केला. या हल्यात तरुणाचा जागीच म्रत्यू झाला आहे. ही घटना देगलूर तालुक्यातील बल्लूर येथे काल रात्री घडली आहे.  

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सचिन वाझेंना तीन वेळा चालायला लावलं...

योगेश धर्माजी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. योगेश हा काल शेतातून ट्रँक्टर घेऊन घराकडे जात असताना योगेशची वाट बघत असलेल्या दहा जणांनी योगेश जवळ येताच हल्ला केला. हल्यात त्याचा जागीच म्रत्यू झाला. योगेशच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारी वरुन देगलूर पोलिस ठाण्यात दोन महिलासह आठ जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 126 गावकारभाऱ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार 
 
भोर (जि. पुणे) : जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या 126 उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे अद्याप सादर केलेला नाही. सुमारे अडीच महिन्यानंतरही खर्चाचा तपशील न देणाऱ्या या गावकारभाऱ्यांवर आयोगाकडून काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भोर तालुक्‍यातील 156 ग्रामपंचायतींपैकी 73 ग्रामपंचायतींमधील 665 जागांकरिता जानेवारी महिन्यात निवडणुका झाल्या. निकालानंतर संबंधित उमेदवाराने एक महिन्याचा आत निवडणुकीच्या खर्चाचा तपशील द्यावा लागतो. परंतु निवडणुकीत विजयी झालेल्या 24 ग्रामपंचायतींमधील 126 ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केलेला नाही. खर्चाचा तपशील देण्याची अंतीम तारीख 18 फेब्रुवारी होती, त्यामुळे निवडणुकीच्या खर्चाचा तपशील न दिलेल्या उमेदवारांची यादी तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधीत 126 उमेदवारांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख