बाळा नांदगावकर म्हणतात,  "माझी ओळख "राजनिष्ठ" अशीच...

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तत्यांनी सुदामा आणि कृष्ण यांच्या मैत्रीचा उल्लेख केला आहे. 'सुदामाचे राजधन' ही पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.
raj14f
raj14f

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या फेसबुकवरून एक पोस्ट शेअर केली आहे.  यात त्यांनी सुदामा आणि कृष्ण यांच्या मैत्रीचा उल्लेख केला आहे.  'सुदामाचे राजधन'  ही पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. 

बाऴा नांदगावकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "सुदामा ची ओळख ही जगाला कृष्णप्रेमा मुळे आहे, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाली तरी सातत्याने लोक अजून ही देत असतात. सुदामा कडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते, तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते. मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते साहेबांमुळेच, माझ्याकडे सुद्धा साहेबांना देण्यासारखे म्हणजे माझी "निष्ठा" जी मी कधीच अर्पण केली आहे. मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख "राजनिष्ठ" अशीच आहे. 


साहेबांचा लाभलेला अनेक दशकांचा सहवास, वेळोवेळी त्यांनी दिलेले प्रेम, त्यांनी दाखवलेला मार्ग, या सर्व गोष्टी म्हणजे माझ्यासारख्या सुदामाचे "राजधन". योगायोग असा ही आहे की साहेबांच्या निवासस्थानाचे नाव सुद्धा "कृष्णकुंज"च आहे. या लॉक डाउन मुळे साहेबांना या दिवशी राज्यभरातून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हजारो लोकांची या वर्षी ही प्रेमळ भेट होणार नाही व त्यामुळे सर्वांच्या मनात या वर्षी एकच ओळ नक्की असणार आहे..." साहेबा प्राण तळमळला" पण हा दुरावा तात्पुरता असून साहेब आणि आपण सर्वजण मिळून लवकरच मार्गक्रमण करून जनतेच्या हिताचे काम करू.आज साहेबांच्या जन्मदिनी मी एकच सांगेन "तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय, तुमको हमारी उमर लग जाए"


राज ठाकरे यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू होते. प्रसिद्ध संगीतकार म्हणून श्रीकांत ठाकरे सर्वांच्या परिचयाचे होते. राज ठाकरे यांचे प्राथमिक शिक्षण दादर मधील बालमोहन विद्यालयात पूर्ण झाले. त्यांचे संपूर्ण बालपण दादर येथेच गेले. राज ठाकरे हे स्वतः उत्तम व्यंग्यचित्रकार आहेत. "जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचाय" असे ध्येय ते बाळगून आहेत.  राज हे उत्तम वक्ते आहेत. आपली मते ते स्पष्टपणे मांडतात. त्यांच्या सगळ्याच सभा प्रचंड गर्दी खेचणाऱ्या असतात. ते स्वतः साहित्य, कला, संगीत यांचे उत्तम जाणकार आहेत.  शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे सांगत जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना सोडली व ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर मराठीचा मुद्दा उचलून धरला. त्यांनी मुंबईत व राज्यात येणाऱ्या परप्रांतिय व विशेषतः बिहार व उत्तर प्रदेशच्या लोकांना टिकेचे लक्ष्य केले. त्यामुळे राज व त्यांची मनसे यावर कायमच टिका होत राहिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com