सारथी संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न झाला : खासदार संभाजीराजे 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा चौथीच्या पाठ्यपुस्तकात धडा आहे. त्याप्रमाणे राजर्षी शाहू महाराज यांच्या इतिहासचा देखील शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा, यासाठी त्वरीत पत्रव्यवहार सुरू करण्यात येईल.
Attempt was made to close Sarathi Sanstha: MP Sambhaji Raje
Attempt was made to close Sarathi Sanstha: MP Sambhaji Raje

पुणे : "छत्रपती शिवाजी महाराज यांचा चौथीच्या पाठ्यपुस्तकात धडा आहे. त्याप्रमाणे राजर्षी शाहू महाराज यांच्या इतिहासचा देखील शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा, यासाठी त्वरीत पत्रव्यवहार सुरू करण्यात येईल. इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराज यांचा धडा आहे, त्याचप्रमाणे मुलांना समजेल अशा नववी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात देखील शिवाजी महाराज, शाहू महाराज, ताराराणी यांचा इतिहास सांगणारे धडे हवेत,' असे मत युवराज, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्यात योगदान दिलेल्या सरदारांच्या घराण्याचे वंशज यांची मराठा सरदार परिषद ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. त्यात खासदार संभाजीराजे बोलत होते. ओंकार कोंढाळकर, अनिकेत कोंडे यांनी ऑनलाइन परिषदेचे आयोजन केले होते. भूषण राऊत, अतुल मारणे, भूषण पवार, ओंकार रणवरे, अमर तलवार, प्रज्वल कोंढरे, अभिषेक कोंढाळकर, दीपक खेमलपुरे यांचे सहकार्य लाभले. 

युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ""स्वराज्य एकट्या मराठ्याचे नव्हते. स्वराज्य सार्वभौम आहे. हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिले. अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांचे हे स्वराज्य आहे, हे त्यांनी सांगितले. कष्टाशिवाय यश मिळत नाही. लोकांमध्ये जाऊन काम करायला पाहिजे. आपल्या वंशजांचा इतिहास सांगायला पाहिजे. त्यांच्यासारखे काम करायला पाहिजे. समाज बदलू शकतो, एवढी ताकद या मराठा घराण्यांमध्ये आहे. असे त्यांनी मराठा सरदारांच्या वंशजांना उदेशून सांगितले. 

किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करायला हवे. रायगड प्राधिकरण मॉडेलप्रमाणे इतर किल्ल्यांचे संवर्धन व्हायला हवे. यासाठी काम सुरू आहे. फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून किल्ले आणि सरदारांचे जुने वाडे यांचे जतन करण्याचा प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अनेक ठिकाणी मराठ्यांची वाइट परिस्थिती आहे. माझा लढा मराठा म्हणून नाही, तर अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना जोडण्यासाठी होता. प्रत्येक जात आणि धर्माचा आदर व्हायला हवा. असेही त्यांनी सांगितले. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभी राहिली आहे. ती बंद पडण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु आम्ही ते होऊ दिले नाही.  गरिबातील गरीब मराठा समाज यातून उभा राहणार आहे. फेलोशिप आणि स्कॉलरशीप सारथीच्या माध्यमातून मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ओंकार कोंढाळकर म्हणाले, मराठा साम्राज्यामध्ये ज्या घराण्यांनी योगदान दिले, त्या सर्व घराण्यांतील तरुणांना एकत्र करणे. त्यांच्याकडून रचनात्मक सामाजिक कार्य करुन घेणे, हा मराठा सरदार परिषदेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे मार्गदर्शन तरुणांना मिळणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com