पोलिस अधिकाऱ्यांकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न..गृहमंत्र्यांच्या गैाप्यस्फोट

महिला अधिकाऱ्यांसह चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही वेळीचं तो हाणून पाडला, असा गैाप्यस्फोट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
4Anil_20Deshmukh.jpeg
4Anil_20Deshmukh.jpeg

मुंबई : एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांसह चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही वेळीचं तो हाणून पाडला, असा गैाप्यस्फोट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. 

"तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करून आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे प्रकार समोर आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हे प्रकरण योग्य पद्धतीनं मार्गी लावलं," असं देशमुख यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्ह्टलं आहे. 

पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यातर्फे आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला, अशी धक्कादायक माहिती देशमुख यांनी या मुलाखतीत दिली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, कोणते अधिकारी यात सहभागी होते, हे प्रकरण कसं थाबवलं याविषयी गृहमंत्री देशमुख यांनी अधिक माहिती दिली नाहूी. या प्रकरणाविषयी नाराजी व्यक्त करून देशमुख म्हणाले की या बाबत मी अधिक माहिती देऊ इच्छित नाही. पोलिस खात्यातील काही अधिकाऱ्यांचे नेत्यांशी थेट जवळचे संबध असतात. याबाबत मी जाहीर व्यक्तव्य करू इच्छित नाही. काही पोलिस अधिकाऱ्यांचे काम चांगलं आहे. 

अमिताभ गुप्ता या पोलिस अधिकाऱ्यांनी येस बँक घोटाळ्यातील आरोपी उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह २२ जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी कडक लॉकडाउनच्या सुरुवातीच्या टप्प्यात संमतीपत्र दिले. त्याच्यामुळे सरकार अडचणीत आले होते. अमिताभ गुप्ता यांना आता पुण्याचे आयुक्त केले आहे. याविषयी विचारलं असता देशमुख म्हणाले की अमिताभ गुप्ता यांच्या हातून त्यावेळी ही मोठी चूक झाली होती. याबाबत गुप्ता यांनी चौकशी समितीसमोर जाहीर कबुलीही दिली आहे. पण आतापर्यंतची त्यांची चांगली कारकिर्द लक्षात घेता त्यांना पुण्याची जबाबदारी दिली आहे.  

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत देशमुख म्हणाले की फडणवीस हे लहान लहान कामांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जातात. फडणवीस माझे चांगले मित्र आहे. फडणवीस यांनी राजभवनामध्ये एखादी खोली घ्यावी, जेणेकरून त्यांचा ये-जा करण्याचा त्रास वाचेल, असा टोला देशमुख यांनी फडणवीस यांना लगावला. पत्रकार अर्णब गोस्वामी, अभिनेत्री कंगना राणावत याच्याविषयी देशमुख यांनी बोलण्यास नकार दिला. या सर्व प्रकरणाला भाजप खतपाणी घालीत असल्याचा आरोप देशमुख यांनी यावेळी केला आहे.  
Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com