राजगृह हल्लाप्रकरणी सुत्रधाराला अटक करा...

राजगृहावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करावी ; या प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्ल्यामागील सुत्रधाराला अटक करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
ramdas atave.jpg
ramdas atave.jpg

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान म्हणून सर्व समाजाची अस्मिता असणारे राजगृह हे निवासस्थान पवित्र आणि ऐतिहासिक आहे. या राजगृहावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करावी ; या प्रकरणाची सखोल चौकशी करून  हल्ल्यामागील सुत्रधाराला अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

रामदास आठवले यांनी दादर हिंदू कॉलनी येथील राजगृहाला भेट दिली. या वेळी आंबेडकर कुटुंबियांची रामदास आठवले यांनी भेट घेतली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांची भेट घेऊन रामदास आठवलेंनी चर्चा केली. यावेळी रिपाइंचे अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, सुरेश बारशिंग, अशोक भालेराव, नागसेन कांबळे, सिद्धार्थ कासारे उपस्थित होते. 

राजगृह हे आंबेडकर कुटुंबियांचे आहे तसेच राजगृह ही आंबेडकरी समाजाची अस्मिता आहे. राजगृह हल्लाप्रकरणी कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. राजगृहाला पूर्ण वेळ पोलिस संरक्षण म्हणून येथे पोलीस चौकी उभारावी तसेच राजगृह हल्ल्याची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. 

प्रकाश आंबेडकर आणि आमचे राजकीय मतभेद आहेत, मात्र, या प्रसंगात सर्व मतभेद बाजूला सारून आम्ही सर्व आंबेडकर कुटुंबियांसोबत आहोत. राजगृह हल्ला निषेधार्ह असून या प्रसंगी आम्ही गटतट बाजूला ठेऊन एकजुटीने आंबेडकर परिवारासोबत आहोत. त्याची ग्वाही म्हणून आज राजगृहात येऊन आंबेडकर कुटुंबीयांपैकी आनंदराज आंबेडकर यांची भेट घेतल्याचे रामदास आठवले म्हणाले.  याप्रकरणी कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन रामदास आठवले म्हणाले. यावेळी राजगृहाबाहेर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यात विवेक पवार, विनोद निकाळजे, सुनील मोरे, रवी गायकवाड;  सो. ना. कांबळे; तरणजीत सिंह, गौतम गायकवाड, विशाल दिवर, विजय वाघमारे, ऍड. अभयाताई सोनवणे, भीमराव सवातकर आदी उपस्थित होते.
Edited  by : Mangesh Mahale
 

हेही वाचा: ''मी पुन्हा येईल..'' घोषणेचं झालं हासं... 

पुणे : ‘मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन. हा चेष्टेचाही विषय झाला. कुठल्याही राज्यकर्त्याने, राजकीय नेत्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहीत धरायचं नसतं. अशा गृहीत धरण्यात थोडासा दर्प आहे, अशा प्रकारची भावना लोकांच्यात झाली आणि यांना धडा शिकवला पाहिजे हा विचार लोकांच्यात पसरला. कुठल्याही लोकशाहीतला नेता आपण अमरपट्टा घेऊन आलोय असा विचार करू शकत नाही. या देशातल्या मतदारांना गृहीत धरले तर तो कधी सहन करत नाही, असे राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले. ही मुलाखत 'सामना'तून प्रसिद्ध करण्यात आली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com