माझा मर्डर करणार आहात का? : प्रकाश आंबेडकरांचा शिवसेनेला सवाल 

खासदार उदयनराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यात "सामना' का भूमिका घेतो आहे, हेच मला कळत नाही.
Are you going to murder me? : Prakash Ambedkar's question to Shiv Sena
Are you going to murder me? : Prakash Ambedkar's question to Shiv Sena

नवी दिल्ली : "आमचे आरक्षण रद्द झाले, तर सर्वांचे आरक्षण रद्द होईल, असे म्हणणारा एक राजा वेडा आहे,' अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर केली होती. त्यावरून राज्यात आंबेडकरांचा निषेध करत त्यांच्याविरोधात टिकेची झोड उठवली जात आहे. शिवसेनेचे मुखपत्र "सामना'मधून त्यांच्यावर निशाना साधण्यात आला आहे. त्याला आंबेडकरांनी दिल्लीत उत्तर दिले. 

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पीडित कुटुंबीयांना भेटून आल्यानंतर ऍड. आंबेडकर हे नवी दिल्लीत एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी "सामना'तील टिकेला उत्तर दिले. 

खासदार उदयनराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यात "सामना' का भूमिका घेतो आहे, हेच मला कळत नाही. मी "सामना'ला एवढंच विचारणार आहे की, तुम्ही बघून घेणार म्हणजे काय करणार? नेमके मला मारणार? की माझा मर्डर करणार आहात? आणि तसे असेल तर कुठे यायचं ते सांगा, मी त्या ठिकाणी येतो, करा माझा मर्डर,' असे आव्हानच आंबेडकरांनी शिवसेनेला दिले आहे. 

काय म्हटलंय 'सामना'च्या अग्रलेखात? 

"जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. आता दसराही येत आहे, त्यामुळे शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पाहावेच लागेल. प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली आणि ते म्हणाले, "एक राजे बिनडोक आहेत, तर दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून वेगळेच काही चालले आहे.' कोल्हापूर व सातारचे "राजे' मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर आंबेडकर यांनी हे विधान केले. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील, अशी स्थिती नाही,' असे आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले होते. 


राष्ट्रपती राजवटीचे आंबेडकरांचे भाकीत 

"राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार हे केंद्र सरकारच्या विरोधात कायम भूमिका घेत आहे, त्यामुळे येत्या डिसेंबरपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल,' असे भाकीतही आंबेडकर यांनी या वेळी बोलताना केले. 

आंबेडकर यांनी म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने लॉकडाउन उठविल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी सुरू करण्यास परवानी दिली होती. मात्र, राज्य सरकारने त्यातील काही गोष्टींना विरोध केला. मंदिरे उघडण्याबाबतचा निर्णयही राज्याने धुडकावला आहे. 

मोठ्या विरोधानंतरही केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकांची अंमलबजावणी करण्यास राज्यातील ठाकरे सरकारने नकार दिला आहे. अशी काही उदाहरणे आहेत की राज्याने केंद्राच्या विरोधात भूमिका घेतली आहे. वास्तविक घटनेनुसार राज्याला केंद्र सरकारविरोधात जाता येत नाही. पण, महाराष्ट्रात तसे घडते आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट अस्तित्वात येईल, असा अंदाज ऍड. आंबेडकरांनी वर्तविला. 
Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com