अपॉइंटमेद्वारे...  इतक्या हजार नागरिकांनी घेतली घरपोच दारू !  - By appointment So many thousands of citizens took home delivery alcohol! | Politics Marathi News - Sarkarnama

अपॉइंटमेद्वारे...  इतक्या हजार नागरिकांनी घेतली घरपोच दारू ! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

राज्यात 15 मेपासून घरपोच मद्यविक्रीची योजना सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना घरपोच डिलिव्हरी देण्यात येत आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर दुकानांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने घरपोच दारू विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना काही अटी, नियम लागू करून घरपोच दारूविक्री सेवा सुरू केली आहे. राज्यात गुरूवारी दिवसभरात 34 हजार 352 ग्राहकांनी घरात बसून दारू खरेदीसाठी नोंदणी करून डिलिव्हरी घेतल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्यात 15 मेपासून घरपोच मद्यविक्रीची योजना सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना घरपोच डिलिव्हरी देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दाऱूसेवन परवाना मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे.

हा ऑनलाईन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली आहे. आता परवाना घेणारे इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकते. ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. 

किरकोळ मद्यविक्री परवान्यासाठी 10 हजार 791 जणांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती, यापैकी 5 हजार 868 जणांना परवानगी देण्याची प्रक्रीया सुरू असल्याचे राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. राज्यातील 33 जिल्ह्यात (गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर हे जिल्हे वगळता) काही जिल्हयांमध्ये परवानगी देण्याची प्रक्रीया सुरू आहे. तर काही जिल्हयांमध्ये दारू विक्री बंद आहे. 

 

राज्यात आतापर्यंत एकूण 5984 गुन्ह्यांची नोंद   

राज्यात 24 मार्चपासून लॅाकडाउन सुरू आहे. महाराष्ट्रात अन्य राज्यातून बेकायदा दारू विक्री रोखण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. मंगळवारी याबाबत राज्यात 83 गुन्हे दाखल करण्यात आले. 32 जणांना अटक करण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकूण 5984 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 2 हजार 664 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 599 वाहने जप्त करण्यात आली आहेत.  सुमारे सोळा कोटी रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. बेकायदा दारू विक्री, वाहतूक करण्याविरूद्द तक्रार करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतो. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी (टोल फ्री क्रमांक  १८००८३३३३३३), (व्हाट्सअँप क्रमांक ८४२२००११३३) (ई-मेल - commstateexcise@gmail.com)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख