अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी होणार - Anil Parab's resort will be investigated | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी होणार

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 2 जून 2021

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.

रत्नागिरी : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विविध आरोप केले आहेत. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर परब यांच्या साई रिसोर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारयांनी दिले आहेत. (Anil Parab's resort will be investigated)

मुरुड (ता. दापोली) येथील साई रिसॅार्टबाबत (sai resort) सोमय्या यांनी लेखी तक्रार जिल्हाधिका-यांकडे केली होती. मुरुड तालुका दापोली येथील गट क्रमांक 446 येथील साई रिसॉर्ट एनेक्सचे बांधकाम बेकायदेशीर आहे. सीआरझेड कायद्याचे (law of CRZ) उल्लंघन केले असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, करत परब यांनी पदाचा दुरुपयोग केला, असल्याचा आरोप त्यांनी केला होता. अधिकार्‍यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले, असे सोमय्या यांनी म्हटले होते. 

हे ही वाचा : 'आरटीओ'च्या अधिकाऱ्यांच्या बॅंक खात्यांचीही चौकशी?

सोमय्या यांच्या तक्रारीनंतर साई रिसॅार्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारयांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, दापोली प्रांताधिकारी हे याबाबत चौकशी अधिकारी असून त्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

साई रिसॉर्टचे बांधकाम करताना बिनशेती परवानगी, रस्ता, घरपट्टी आदींबाबत नियमांचे उल्लंघन करून केलेले आहे का याबाबतची वस्तूस्थिती तपासण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले आले आहे. चौकशी समितीने अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. अप्पर जिल्‍हाधिकारी संजय शिंदे यांनी तसे पत्र दिले आहे. त्यामुळे अनिल परब यांची डोकेदुखी वाढणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. किरीट सोमय्या यांनी आज दापोली पोलिस स्टेशनला परब यांच्या साई रिसॅार्ट विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा : फडणवीसांनी आता केंद्राकडून जास्तीत जास्त मदत आणावी: एकनाथ खडसे

दरम्यान, मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॅाम्बनंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाची चौकशी CBI कडून सुरू आहे. या प्रकरणात परब यांचाही सहभाग असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. सोमय्या यांच्याकडून सातत्याने परब यांना लक्ष्य केले जात आहे. ते म्हणाले, ठाकरे सरकार कोरोना काळात केवळ भ्रष्टाचार करत आहे. आता अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा क्रमांक आहे. त्यांच्यावर अनेक प्रकरणांत घोटाळा केल्याचे आरोप आहेत. राज्यपालांनीही त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत. विविध यंत्रणांमार्फत तपास सुरू आहे. त्यामुळे ते केवळ दोन महिन्यांचे पाहूणे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

Edited By - Amol Jaybhaye   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख