फडणवीस आणि खडसे यांच्या वादात अमृतावहिनींची उडी

मात्र ते ट्विट लगेच डिलिट केले...
amruta-fadnavis-tweet-on-kh.jpg
amruta-fadnavis-tweet-on-kh.jpg

पुणे : भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वादात आता अमृता फडणवीस यांनी उडी मारली आहे. खडसे यांच्या जीवनापासून बरेच काही शिकल्याने त्यांच्यासारखी चूक करणार नसल्याचे अमृता यांनी म्हटले आहे. त्यांनी मराठीतून खडसे यांना उत्तर दिले आहे. मात्र त्यात अनेक चुका असल्याने नेटकऱ्यांनी त्याबद्दल अमृता यांच्यावर टीका केली. मात्र अर्ध्या तासातच त्यांनी ते ट्वीट डिलिट केले.

फडणविसांनी मला त्रास दिल्याने मी त्यांना जाब विचारणारच, अशी घोषणा खडसे यांनी काल आपल्यावरील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केली होती. तसेच एका खोटारड्या हॅकरच्या तक्रारीवरून माझा राजीनामा घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याला फडवणीस यांनी नवी दिल्लीत उत्तर दिले.

हॅकर मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतल्याचे फडणवीसांनी आज स्पष्ट केेले. भोसरीतील एमआयडीसीची जमीन खडसेंनी पत्नी आणि जावयाच्या नावावर घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. तसेच याबाबत उच्च न्यायालयात याचिका सुरू असल्याचीही माहिती आज पत्रकारांशी बोलताना दिली. 

त्याला उत्तर देताना  खडसेंनीही या जमिनीची खरेदी पत्नी व जावयाने केली आहे, ती नियमानुसारच असल्याचा दावा केला. आपल्यावरील अन्यायाबाबत चार वर्षांपासून घरातच धुणी धुतोय, पक्षातच नाराजी व्यक्त करतोय, तिकडून प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मी रस्त्यावर उतरलो, असे प्रत्युत्तर खडसेंनी दिले. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी राजीनामा घेतला असेल, तर हा व्यवहार पत्नी व जावयाच्या नावाने आहे, त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. एखादा व्यवहार, कार्यक्रम अमृताजींनी घेतला तर त्याच्याशी देवेंद्रजींचा संबंध जोडता येईल का? असा प्रश्‍न उपस्थित करत ही जमीन एमआयडीसीची नव्हतीच. जमिनीच्या सातबाऱ्यावर आजही मूळ मालकाचे नाव आहे, हा व्यवहारही नियमानुसार सर्व कर, मुद्रांक शुल्क भरुन झाला आहे. त्यासंबंधी सर्व पुरावे असल्याचा दावाही खडसेंनी केला.

खडसेंच्या या दाव्याला अमृतावहिनींनी प्रत्युत्तर दिले. तसेच त्यांच्यासारखी चूक करणार नसल्याचाही निर्वाळा दिला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com