पालकमंत्री, मुख्यमंत्री शिवसेनेचे तरीही आमची दखल कोणी घेत नाही....

कल्याणमध्ये एनआरसी कंपनी कामगारांच्या थकीत देणी मिळण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून आंदोलन सुरु आहे.
eknath28.jpg
eknath28.jpg

कल्याण : कल्याणमध्ये एनआरसी कंपनी कामगारांच्या थकीत देणी मिळण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून आंदोलन सुरु आहे.या आंदोलनास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली.

आमदार, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना तरीही आमची दखल घेतली नाही, असा सवाल महिलांनी उपस्थित करताच 'कोणी किती मोठा माणूस असला तरी त्याला कामगारांची देणी दिल्याशिवाय पळ काढता येणार नाही. सरकार त्याला पाठिशी घालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकरच बैठक लागून त्यावर तोडगा काढला जाईल,' असे उत्तर पालकमंत्र्यांनी दिले आहे.

एनआरसी संघर्ष समितीच्या आंदोलनास मनसेचे आमदार राजू पाटील, शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला होता. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नव्हता. काल पालकमंत्र्यांनी आंदोलनास भेट दिली.आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना तरीही आमची दखल घेतली गेली नाही. संतप्त महिलेकडून पालकमंत्र्यांना सवाल केला नंतर पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले मी या प्रकरणी मार्ग काढायला आलो आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी मला माहिती दिली. 

लवकरच वेळ ठरवून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या प्रकरणी तोडगा काढला जाईल, अशा विश्वास कामगार वर्गाला शिंदे यांनी यावेळी दिला. दरम्यान महिलांनी एनआरसी वसाहतीतील घरे पाडकाम करावाईस विरोध केला तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर हात उगारला. ही माहिती महिलांनी पालकमंत्र्यांना दिली. त्यावर पालकमंत्र्यांनी पोलिसांना सांगितले की, जे काही कायदेशीर आहे. त्या बाजूनेच पोलिसांनी काम करावे असे सूचित केले. कोणताही बेकायदेशीर कारवाई पोलिसांनी करु नये, अशी ताकीद त्यांनी दिली आहे.

हेही वाचा : खासदार डेलकर यांनी आत्महत्या का केली?
   
मुंबई : सात वेळा लोकसभेचे सदस्य असलेल्या मोहन डेलकर यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हायला हवी. डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या का केली? गुजरात, दिल्लीत त्यांची घरे आहेत. पण मुंबईचे पोलीस आपल्या मृत्यूनंतर ‘सुसाईड नोट’ हा पुरावा मानून आरोपींना अटक करतील ही भावना त्यांच्या मनात नक्कीच असेल. आपल्या झुंजारपणासाठी, स्वाभिमानासाठी एका खासदाराला प्राणाचे मोल द्यावे लागले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आता काय करणार आहेत? असा सवाल सामनाच्या रोखठोक मधून खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. मोहन डेलकर हे हिंमतबाज होते, ते पळपुटे नव्हते. ते आत्महत्या का करतील ?  सिल्वासा, दादरा-नगर हवेली हा लहान केंद्रशासित प्रदेश. त्या प्रदेशातला खरा लोकनेता मोहन डेलकरच होता. अशा मोहन डेलकरांना आत्महत्या करावी लागली. मग त्यांचा वाद कुणाशी होता व शेवटचे प्रोव्होकेशन कोणाचे होते? मोहन डेलकर राजकारणात होते. ते दबंग होते म्हणून त्यांचा संशयास्पद मृत्यू दुर्लक्षित करून चालणार नाही, असे रोखठोकमध्ये नमूद केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com