Addition of 5134 new corona patients in the state | Sarkarnama

राज्यात 5134 नव्या कोरोना रुग्णांची भर 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 7 जुलै 2020

राज्यात कोरोनाचा जोर वाढला असून, मंगळवारी (ता. 7 जुलै) दिवसभरात 5 हजार 134 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोविड-19 विषाणूच्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 17 हजार 121 झाली आहे. आणखी 224 मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 9 हजार 250 वर पोचला आहे. राज्यात एकूण 88 हजार 294 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

मुंबई : राज्यात कोरोनाचा जोर वाढला असून, मंगळवारी (ता. 7 जुलै) दिवसभरात 5 हजार 134 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोविड-19 विषाणूच्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 17 हजार 121 झाली आहे. आणखी 224 मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 9 हजार 250 वर पोचला आहे. राज्यात एकूण 88 हजार 294 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

राज्यात मंगळवारी कोविड-19 विषाणूबाधेने आणखी 224 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईत 64, ठाणे जिल्ह्यात 73, पुणे मंडळात 48, औरंगाबाद मंडळात सात, नाशिक मंडळात 24, लातूर मंडळात पाच, अकोला मंडळात दोन व इतर राज्यांतील एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर 4.26 टक्के झाला आहे. आतापर्यंत 11 लाख 61 हजार 311 कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैकी 2 लाख 17 हजार 121 म्हणजे 18.69 टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 31 हजार 995 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आणि 45 हजार 463 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

3296 रुग्ण कोरोनामुक्त 

राज्यात मंगळवारी 3 हजार 296 कोरोनामुक्त रुग्णांना घरी पाठविण्यात आले. आतापार्यंत 1 लाख 18 हजार 558 जणांनी कोरोनावर मात केली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.6 टक्के झाले आहे. 
 

मुंबईत 806 नव्या रुग्णांची भर 

मुंबई शहरात दररोज हजारांच्या वर आढळणारी रुग्णसंख्या मंगळवारी (ता. 7) काहीशी कमी आली असून दिवसभरात 806 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 86 हजार 132 झाली आहे. तसेच, 64 रुग्णांच्या मृत्युमुळे मृतांचा आकडा 4 हजार 999 वर पोचला आहे. तसेच, 985 रुग्ण बरे होऊन घरी देखील परतल्याने प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

मुंबईत नव्याने नोंद झालेल्या 64 मृत्यूंपैकी 54 जणांना दीर्घकालीन आजार होते. दरम्यान, मृत व्यक्तींमध्ये 44 पुरुषांचा, तर 20 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 5 जणांचे वय 40 च्या खाली होते. तर 40 रुग्ण 60 वर्षांवरील होते. तसेच इतर 19 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. यासोबतच मुंबईत 933 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 60 हजार 114 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, 985 जण कोरोनामुक्त झाल्याने बरे होणाऱ्यांची संख्या 58 हजार 137 झाली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांचा दर 67 टक्के झाला आहे, तर 6 जुलैपर्यंत एकूण 3 लाख 63 हजार 120 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहे. तर 29 जून ते 6 जुलैदरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.58 टक्के इतका आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा दर हा 44 दिवसांवर गेला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख