MPSC Exam : विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन एल्गार...हँशटॅग मोहीम सुरू - MPSC Exam: Students Online Movement Hanshtag Campaign Launched | Politics Marathi News - Sarkarnama

MPSC Exam : विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन एल्गार...हँशटॅग मोहीम सुरू

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 मार्च 2021

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एल्गार पुकारला आहे. त्यांनी आँनलाइन मोर्चा काढला आहे.

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांनी असंतोष व्यक्त नुकतेच पुण्यात आंदोलन केले होते. एमपीएससीच्या परीक्षा सहा वेळा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी आक्रमक झाले. वेगवेगळ्या कारणामुळे एमपीएससी परीक्षा पुढे का ढकलल्या जातात, याचं नेमकं उत्तर राज्यकर्ते आणि राज्य लोकसेवा आयोग विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. 

पुण्यात आंदोलन केल्यानंतर आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एल्गार पुकारला आहे. त्यांनी आँनलाइन मोर्चा काढला आहे. सरकारी रिक्त पदाची भरती mpsc अंतर्गतच झाली पाहिजे, आरोग्य विभागाची पदभरती रद्द करून ती पुन्हा एमपीएससी द्वारे घ्यावी, परीक्षाच्या वेळापत्रकात पारदर्शकता आणा, सरकारने युवकांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार व्हावा, आदी मागण्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या आहेत. 

सरकारी पदे भरताना काळा बाजार केला जातो, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. काळाबाजार करून अपात्र उमेदवारांची भरती केली जाते, त्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. 

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन मोर्चासाठी #OnlyMPSC
#MPSC_2019_joing, #नवीन जागा काढाव्यात #आरोग्य विभागाची पदभरती रद्द करून ती पुन्हा एमपीएससीव्दारे घ्यावी #पारदर्शका #नवीन जाहीरात #वेळापत्रक 2021 अशी हँशटॅग मोहीम सुरू करण्यात आली आहे.   
 
सध्या राज्यातील खूप विद्यार्थी हे UPSC तसेच MPSC च्या परीक्षांकडे करीअरची संधी म्हणून पाहू लागले आहेत. या क्षेत्रात असलेल्या करिअर संधीबाबत विद्यार्थी तसेच पालकांना प्रचंड उत्सुकता दिसून येते. महाराष्ट्र रहिवासी असलेली तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली व्यक्ती या परीक्षेला पात्र ठरू शकते. साधारण प्रवर्गासाठी किमान 19 व कमाल 38 वर्षे अशी वयोमर्यादा आयोगाकडून जाहीर केली गेलेली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणार्‍या राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून नुकत्याच वाढीव अशा 3 पदांसह एकूण 24 प्रकारची वेगवेगळी पदे भरली जातात. त्यातील काही महत्वाची पदे खाली नमूद केली आहेत. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसीलदार, सहा.विक्रीकर आयुक्त, जिल्हा उप निबंधक, गटविकास अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखाधिकारी इ.

कोविड साथीमुळे ही परीक्षा पुढे ढकलल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यासाठी सूचना राज्य सरकारने दिल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. खरे कारण मात्र दुसरेच असण्याची शक्यता आहे. यातील प्रमुख कारण आहे ते मराठा आरक्षणाच्या भिजत घोंगड्याचे. मराठा आरक्षणावर निर्णय होत नसल्याने सरकारी नोकरभरतीचे त्यातही एमपीएससीमार्फत होणाऱ्या भरतीचे काय करायचे, यात राज्य सरकारची कोंडी झाली आहे. मराठा आरक्षणप्रश्नी दोन्ही छत्रपती म्हणजे खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले हे आक्रमक झाले आहेत. विनायक मेटेंसारखे आमदारही याबाबत आग्रही आहेत. मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत भरती नको, अशी या नेत्यांची मागणी आहे.  
Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख