मराठा आरक्षण आंदोलन २०२० तिसऱ्या पर्वाला सुरुवात..  - Maratha Reservation Agitation Third Phase Started | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षण आंदोलन २०२० तिसऱ्या पर्वाला सुरुवात.. 

विश्वभूषण लिमये
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

मूक मोर्चा झाला,ठोक मोर्चा झाला,आता आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुचं राहणार असे मराठा आरक्षण आंदोलन २०२०चे समन्वयय आबासाहेब पाटील यांनी येथे जाहीर केले

सोलापूर : मूक मोर्चा झाला,ठोक मोर्चा झाला,आता आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुचं राहणार असे मराठा आरक्षण आंदोलन २०२०चे समन्वयय आबासाहेब पाटील यांनी येथे जाहीर केले. मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण व त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. हा निर्णय देताना न्यायालयाने यापूर्वी दिलेले प्रवेश व नोकर भरती संदर्भात दिलेल्या आरक्षणास स्थगिती देण्यात आली. त्यावरून तीव्र भावना उमटत आहेत.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभर मराठा आरक्षण आंदोलकांकडून अतिशय तीव्र भावना उमटत आहेत.  त्याच पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षण हक्क परिषद उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथे पार पडली.  आजपासून मराठा आरक्षण आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाल्याची घोषणा आज मराठा आरक्षण राज्य समन्वयक आबासाहेब  पाटलांनी केली आहे.  येत्या दहा दिवसांमध्ये राज्यभर कशापद्धतीने आंदोलन केली जातील याची रूपरेषा ठरवली जाणार आहे. 

'आधी आरक्षण मागच नोकर भरती' ही टॅग लाईन या परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षण आंदोलकांना देण्यात आली.  अगोदर मराठा आरक्षण मूक मोर्चा झाला नंतर मराठा आरक्षण ठोक मोर्चा झाला आता जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  दरम्यान मराठ्यांच्या आरक्षणासाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांसह सर्व मतभेद विसरून रस्त्यावरील आणि न्यायालयातील लढ्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन आबासाहेब पाटलांनी आज उस्मानाबाद मधील तामलवाडी येथे केले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख