कोविड पूर्ण जात नाही तोपर्यंत परिक्षा आॅनलाईनच - Education Minister Uday Samant On Starting of Colleges | Politics Marathi News - Sarkarnama

कोविड पूर्ण जात नाही तोपर्यंत परिक्षा आॅनलाईनच

सागर आव्हाड
रविवार, 24 जानेवारी 2021

आज पुण्यात आले असता सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरे दिली. जाणीव पूर्वक जात पडताळणीचे प्रकरण कुणी ठेवत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू.  जात पडताळणीसाठीचा अर्ज दाखल केल्याच्या पावतीवर प्रवेश मिळेल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. 

पुणे : महाविद्यालय कधी सुरू होणार हाच प्रश्न सगळीकडे विचारला जातोय. आम्ही विद्यापीठाना सांगूनच हा निर्णय लवकर घेऊ. मात्र, कोविडच्या दृष्टीने निर्णय घ्यावा लागतोय. कोविड पूर्णतः जात नाही तोपर्यंत ऑनलाइनच परीक्षा घेतल्या जातील. फिजिकली परीक्षा होत नाही तोपर्यंत निर्णय होणार नाही, अशी सगळ्या घटकांची मानसिकता आहे, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले.

आज पुण्यात आले असता सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरे दिली. जाणीव पूर्वक जात पडताळणीचे प्रकरण कुणी ठेवत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू.  जात पडताळणीसाठीचा अर्ज दाखल केल्याच्या पावतीवर प्रवेश मिळेल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. 

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणावर गदा येईल अशी भीती ओबीसी नेते व्यक्त करत आहेत. त्याबाबत बोलताना सामंत म्हणाले, "आरक्षण देत असतांना कुणाचेही आरक्षण काढून घेतलं जाणार नाही ही महाविकास आघाडीची भूमिका आहे. वडेट्टीवार ओबीसी बाबत जे काही म्हणत आहेत त्यावरून मंत्रिमंडळात वाद नाही,''

किमान समान कार्यक्रम हा प्रबोधन ठाकरे यांनी वेगळ्या रुपाने आधी मांडला होता. त्याला आता उद्धव ठाकरेंनी चांगली साथ देत भाजपाला सत्तेपासून त्यांनी दूर ठेवले आहे. शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्वाला मुरड घातली असे मला तरी वाटत नाही. भाजपाच्या हिंदुत्वाला शिवसेनेने चांगला धडा शिकवला आहे. असे काल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते. त्याबाबत प्रतिक्रिया विचारला असता, ''सुशीलकुमार शिंदे हे राष्ट्रीय नेते त्यांच्या विधानानंतर मी बोलणं योग्य नाही, असे उत्तर सामंत यांनी दिले. आम्ही शेतकरी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी नसलो तरी महाविकास आघाडीचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे, असेही सामंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख