अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी १०० किलोमीटर धावला 'आर्यनमॅन'! - Baramati Ironman Ran Hundred Kilometeres to Give Birthday Wishes to Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी १०० किलोमीटर धावला 'आर्यनमॅन'!

संपत मोरे
सोमवार, 27 जुलै 2020

बारामती येथील वैष्णवी ग्राफिक्सचे संचालक सतिश ननावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चाहते आहेत. ते मूळचे सोनगाव येथील आहेत.उपमुख्यमंत्री अजितदादा शतायुषी व्हावेत म्हणून त्यांनी पुण्यातील सारसबागेतील गणरायाचे दर्शन घेवून या दौडीला काल दुपारी सुरुवात केली. अजितदादा हे शतायुषी होण्याबरोबरच सामान्यांना 'आरोग्य संदेश' देण्यासाठी त्यांनी या दौडीला सुरुवात केली.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे चाहते बारामती येथील 'आयर्नमॅन' सतिश ननावरे यांनी पुणे-बारामती शंभर किलोमीटरच्या दौडीला काल सारसबागेतील गणरायाचे दर्शन घेवून प्रारंभ केला. पुणे-बारामती ही शंभर किलोमीटरची दौड विक्रमी अडीच तासात पूर्ण करण्याचा संकल्प सोडत त्यांनी दौडीला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शतायुषी व्हावेत ही सदिच्छा मनात बाळगून १०० किलोमीटर रनिंग केल्याचे ननावरे यांनी सांगितले. 

"नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या वेगवेगळ्या कल्पना असतात पण मी पुणे ते बारामती पळत जाऊन अजितदादांना  दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना केली."असे ते म्हणाले.पुणे ते बारामती हा प्रवास त्यांनी बारा तासात पूर्ण केला. यावेळी रस्त्यावर अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ननावरे यांचे स्वागत केले.अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांनीही अजित दादांच्या कार्यालयाच्या वतीने ननावरे यांचे स्वागत केले.

बारामती येथील वैष्णवी ग्राफिक्सचे संचालक सतिश ननावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चाहते आहेत. ते मूळचे सोनगाव येथील आहेत.उपमुख्यमंत्री अजितदादा शतायुषी व्हावेत म्हणून त्यांनी पुण्यातील सारसबागेतील गणरायाचे दर्शन घेवून या दौडीला काल दुपारी सुरुवात केली. अजितदादा हे शतायुषी होण्याबरोबरच सामान्यांना 'आरोग्य संदेश' देण्यासाठी त्यांनी या दौडीला सुरुवात केली.

सतिश ननावरे यांनी ऑस्ट्रिया, झुरीच आणि स्विझर्लंड या तीन देशात 'आयर्नमॅन' हा किताब मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी अष्टविनायक यात्राही विक्रमी वेळेत दौड करुन पूर्ण केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्‍ठ नेते खासदार शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमत्त त्यांनी तिरुपती बालाजी ते बारामती हे ११०० किलोमीटरचे अंतर सायकलवर कोठेही थांबा न घेता विक्रमी ५२ तासांत पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.आजच्या दौडीबाबत सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले जात आहे.

Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख