सातारकरांना दिलासा : दहा महिन्यांचे बाळ अन्‌ 75 वर्षांच्या आजी कोरोनामुक्त

फक्त दहा महिन्याचं बाळ... आज कोरोना मुक्त झालं... त्याला माहितही नसेल तो आज केवढं मोठं संकट लीलया पेलून सुखरूप बाहेर पडलं... आई- वडिलांची हिम्मत धरून मागचे दोन आठवडे ज्या धीरोदत्तपणे काढले. त्यांच्या आनंदाला आज पारावार राहिला नाही.
Infant and Old Lady Came out of Karad Hospital After Successful Corona Treatement
Infant and Old Lady Came out of Karad Hospital After Successful Corona Treatement

सातारा : फक्त दहा महिन्याचं बाळ...  आज कोरोना मुक्त झालं...  त्याला माहितही नसेल तो आज केवढं मोठं संकट लीलया पेलून सुखरूप बाहेर पडलं... आई- वडिलांची हिम्मत धरून मागचे दोन आठवडे ज्या धीरोदत्तपणे काढले.  त्यांच्या आनंदाला आज पारावार राहिला नाही.

12 एप्रिलला 10 महिन्याचे बाळ पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल आला. त्यावेळी जिल्ह्यातील जनतेचे मन धस्स झालं.  बाळ बरं व्हावं असे बरेच जण बोलून दाखवत होते.  कृष्णा हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्स, सर्व आरोग्य कर्मचारी रुग्ण बरे व्हावेत म्हणून अपार कष्ट करत आहेत.

त्यांच्या प्रति जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी चित्रफितीतून संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. आज बाळ कोरोनामुक्त होऊन बाहेर पडलं हे ऐकून अजून लाखोंच्या सदिच्छा त्यांच्या व्यावसायिक कर्तव्य मूल्यात अजून भर घालतील. रूग्णालयातून बाळ बाहेर येताना पाहताना अनेकांचे डोळे आनंदाने भरून आले. त्यांचे 14 व्या व पंधराव्या दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि आज तो कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी जाहीर केले.

त्याच वेळी दुसरी याच रूग्णालयातील 75 वर्षांची आजीही कोरोनाशी दोन हात करून कोरोनामुक्त झाल्या. दहा महिन्याचं बाळ आणि 75 वर्षाच्या आजी दोघांनीही सातारकरांना मोठा दिलासा दिला आहे. आत्मविश्वासानं, संयमानं, दक्षता घेऊन कोरोना विरुद्धची लढाई आपण जिंकू शकतो. कोरोना विषाणू संसर्ग हा आपल्या संयमाची परीक्षा घेतो आहे. त्यामुळे आपण सर्वांनी घरात बसण्याचा संयम पाळू या आणि. कोरोनाला हद्दपार करूया...

आज कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमधून तीन रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडले. एक दहा महिन्याचं बाळ, 75वर्षाच्या आजी आणि 28 वर्षाचा तरुण. या तीघांना कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश  भोसले, कृष्णा कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com