अख्खे बारवी धरणच ठाणे महापालिकेला विका : प्रताप सरनाईकांची मागणी

सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेचे कोणतेही स्वत:चे धरण नसल्यामुळे इतर संस्थेवर पाण्यासाठी अवलंबून रहावे लागत आहे. बारवी धरण हे एम.आय.डी.सी. च्या मालकीचे आहे. परंतु, राज्यामध्ये कुठेही धरणाचे पाणी महापालिकांना विकण्याची जबाबदारी ही एम.आय.डी.सी.ची नसते. तर फक्त त्यांच्या लघुउद्योगांना व उद्योगांना पाणी पुरवठा करण्याचे काम एम.आय.डी.सी. करते. परंतु, बारवी धरणातून मात्र प्रमुख्याने उद्योगांपेक्षा महानगरपालिकांनाच जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे लागते
Sena MLA Pratap Sarnaik Demands Sell of Barvi Dam to Thane Corporation
Sena MLA Pratap Sarnaik Demands Sell of Barvi Dam to Thane Corporation

ठाणे : ठाणे महापालिका बारवी धरणातून वाढीव शंभर दशलक्ष लीटर पाणी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हे धरणच थेट ठाणे महापालिकेकडे हस्तांतरीत करावे अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

''बारवी धरणातून एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे व मिरा-भाइर्दर महानगरपालिकेस तसेच औद्योगिक क्षेत्नास पाणी पुरवठा होतो. या धरणाची उंची मागील वर्षापासून वाढविल्यामुळे अतिरिक्त पाणी साठा निर्माण झाला आहे. वाढीव उंचीनुसार बारवी धरणाची पाणी साठवण क्षमता अंदाजे ९३२ दशलक्ष लि. असून त्यापैकी ठाणो महानगरपालिका ११० दशलक्ष लि. पाणी पुरवठा घेत आहे. हा पाणी साठा एम.एम.आर. रिजनमधील महानगरपालिकेच्या वाढत्या लोकसंख्येसाठी उपयोगी पडून ठाणे महानगरपालिका इतर महानगरपालिकांना पाण्यासाठी सहकार्य करु शकणार आहे,'' असे सरनाईक यांनी म्हटले आहे.

''सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेचे कोणतेही स्वत:चे धरण नसल्यामुळे इतर संस्थेवर पाण्यासाठी अवलंबून रहावे लागत आहे. बारवी धरण हे एम.आय.डी.सी. च्या मालकीचे आहे. परंतु, राज्यामध्ये कुठेही धरणाचे पाणी महापालिकांना विकण्याची जबाबदारी ही एम.आय.डी.सी.ची नसते. तर फक्त त्यांच्या लघुउद्योगांना व उद्योगांना पाणी पुरवठा करण्याचे काम एम.आय.डी.सी. करते. परंतु, बारवी धरणातून मात्र प्रमुख्याने उद्योगांपेक्षा महानगरपालिकांनाच जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे लागते. ज्याप्रमाणे नवी-मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेऊन त्यांचा पाणी प्रश्न सोडविला, त्याच धर्तीवर बारवी धरण राज्य शासनाने महापालिकेला विकत द्यावे,'' अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे. त्यासाठी महापालिका स्वत:चा निधी व काही राज्य शासनाकडून अनुदान व काही कर्ज उपलब्ध करून नक्कीच बारवी धरण विकत घेईल अशी अपेक्षा सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

''यामुळे आजपर्यंत ज्या ज्या महापालिकांना बारवी धरणाच्या माध्यमातून पाणी देण्यात येते, ते तसेच वितरीत करण्यात येईल ते पाणी देण्याची जबाबदारी ही महापालिकेकडे राहील. तसेच एम.आय.डी.सी. च्या कंपन्याना जे पाणी लागेल ते पाणी देण्याची जबाबदारी सुद्धा महापालिकेची राहील. एम.आय.डी.सी. च्या व शासनाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून हे धरण महापालिकेला विकत द्यावे जेणोकरून महानगरपालिकेची भविष्यातील चिंता दूर होईल. गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महापालिका शाई व काळू धरणासाठी प्रयत्न करत आहे. परंतु, तो प्रयत्न स्थानिकांच्या असलेल्या विरोधामुळे सफल झालेला नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून एम.आय.डी.सी. ने बारवी धरण महापालिकेला विकत देऊन हस्तांतरीत करावे,'' अशी मागणी त्यांनी उद्योगमंत्र्यांकडे केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com