'अप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात’ असे म्हणत धनंजय मुंडेचं अभिवादन..   - dhananjay munde tribute gopinath munde birth anniversary Twitt | Politics Marathi News - Sarkarnama

'अप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात’ असे म्हणत धनंजय मुंडेचं अभिवादन..  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 डिसेंबर 2020

जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते.

पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले काका भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिवादन करत आपल्या भावनांना वाट मोकळी करू दिली आहे.‘आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात’ असे म्हणत धनंजय मुंडे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा आज (ता. १२ डिसेंबर) जन्मदिन आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी यानिमित्ताने टि्वट केलं आहे. आपल्या टि्वटमध्ये ते म्हणतात, "अप्पा...खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते. त्याच प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व. अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन." 

 
"आक्रमक आंदोलन कर...हा गोपीनाथ मुंडे तुझ्या पाठीशी आहे..."
पिंपरी : गोपीनाथ मुंडेसाहेंबाची बुद्धी अतिशय तल्लख होती. सामान्य कार्यकर्त्यांचीही जाण ठेवून ते त्याला बळ देत होते. त्याचा प्रत्यय २००११ मध्ये मी स्वत घेतला. २०१० ला मी कलकत्ता ते काश्मीर या भाजयुमोच्या तिरंगा यात्रेत सामील झालो होतो. पण, आम्हाला जम्मू येथे अडविण्यात आले. तरीही पर्यटक बनून आम्ही काही युवक कार्यकर्ते श्रीनगरला पोचलो आणि तेथे तिरंगा फडकावला होता. या घटनेच्या दुसऱ्या वर्षी मुंडेसाहेब पिंपरी-चिंचवडमध्ये सावरकर मंडळाच्या पुरस्कार वितरणासाठी आले. त्यावेळी मी सभागृहात खाली बसलो होतो. ते साहेबांनी पाहिले. त्यांनी मंडळाचे भास्कर रिकामे यांना मला वर बोलवायला सांगितले. जम्मू काश्मीरला जाऊन तेथे तिरंगा फडकावणाऱ्या मोरेश्वरचा सत्कार करायचा आहे, असे सांगत त्यांनी शाल पांघरून व पुस्तक भेट देऊन माझा जाहीर सत्कार केला, अशी गोपीनाथ मुंडेसाहेबाची ह्र्द्य आठवण त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस आणि स्वीकृत नगरसवेक अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी सांगत आपल्या आदरणीय नेत्याच्या आठवणींना उजाळा दिला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख