जळगावच्या दौऱ्यावर असताना फडणवीसांना झाली कुरकुरीत खाण्याची इच्छा ! 

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (ता. 9 जुलै) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मालेगावहून मोटारीने जळगावकडे येत असताना एरंडोल (जि. जळगाव) येथे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते थांबले. त्या ठिकाणी त्यांनी कुरकुरीत खाण्याची इच्छा व्यक्त केली अन कार्यकर्त्यांनी तेथे प्रसिद्ध असलेले खारे शेंगदाणे आणि फुटाणे त्यांना दिले.
Devendra Fadnavis wants to eat crunchy!
Devendra Fadnavis wants to eat crunchy!

एरंडोल : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (ता. 9 जुलै) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मालेगावहून मोटारीने जळगावकडे येत असताना एरंडोल (जि. जळगाव) येथे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते थांबले. त्या ठिकाणी त्यांनी कुरकुरीत खाण्याची इच्छा व्यक्त केली अन कार्यकर्त्यांनी तेथे प्रसिद्ध असलेले खारे शेंगदाणे आणि फुटाणे त्यांना दिले. फडणवीसांनीही त्याचा आस्वाद घेत कार्यकर्त्यांशी चर्चा केली अन आपल्यातील साधेपणा दाखवून दिला. 

विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह माजी मंत्री व पदाधिकारी कोरोना विषाणू साथीची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. धुळे येथून जळगाव येथे सर्व पदाधिकारी जात असताना माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांना फोन करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्यासह सर्व सहकारी एरंडोल येथे थांबणार असून, त्याठिकाणी चहा घेणार आहेत, असे सांगितले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चौफुली येथे थांबण्याची सूचना केली. 

विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा थांबला. फडणवीस यांनी कार्यकर्ते व जय बजरंग ट्रेडर्सचे संचालक महेंद्र चौधरी यांना याठिकाणी काही कुरकुरीत पदार्थ मिळेल का? असे विचारले. चौधरी यांनी शहरातील फुटाणे व खारे शेंगदाणे प्रसिद्ध असल्याचे सांगितले. तसेच, सागर रसवंतीचे संचालक अशोक भोई यांना त्वरित फुटाणे व शेंगदाणे आणण्यास सांगितले. विरोधी पक्षनेते फडणवीस व त्यांच्यासह उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी फुटाणे व खारे शेंगदाणे याचा आस्वाद घेतला. तसेच, महेंद्र चौधरी यांनी घरून आणलेली कॉफी बरोबर घेतली. 

सुमारे पाच मिनिटे फडणवीस यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी कोरोनाचा संसर्ग, पाऊस, खरीप हंगाम या विषयावर चर्चा करून जळगावकडे प्रयाण केले. माजी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या साधेपणामुळे कार्यकर्ते आपापसांत चर्चा करीत होते. खारे शेंगदाणे व फुटाणे यांची चव छान असल्याचे फडणवीस यांनी नगराध्यक्ष करण पवार यांना जाताना सांगितले. 

भाजपने मुंडेंना सन्मानाने पद द्यावे अन पंकजांनीही ते घ्यावे 

बीड : रंग पाहण्यासाठी असतो, पिण्यासाठी नाही अशी गावखेड्यातली जुनी म्हण आहे. तसे भारतीय जनता पक्षामधील नेत्यांनी व पंकजा मुंडे यांनी एकमेकांचे रंग पाहिले आहेत. पण, आता वेळ आली आहे, "झाले गेले विसरण्याची आणि पुन्हा साथ साथ चालण्याची.' तसे हा फॉर्म्युला दोघांच्याही हिताचा आहे. 

पंकजा मुंडे यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. यात्रेला ठिकठिकाणी मोठा प्रतिसादही मिळाला. मात्र, त्याच पंकजा मुंडे आणि पक्षाचा वरदहस्त असलेल्या भाजप नेत्यांमध्ये दरी पाडण्यासाठी एक वर्ग सक्रीय झाला. योगायोगाने सत्ता आली, पंकजा मुंडे यांना महत्वाची खातीही मिळाली. पण, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यात जाणिवपूर्वक दुरावा तयार करून वाढविण्याचे प्रयत्न झाले. पंकजा मुंडे या लोकनेत्या असल्याने त्यांच्याबद्दल नेतृत्वाच्या मनात भीती निर्माण केली जाऊ लागली. त्यातूनच त्यांच्याकडील खाती कमी करणे, खात्याला त्यांच्या मर्जीविरुद्धचा प्रधान सचिव देणे, असे प्रकार घडले. तसे, टाळी एका हाताने नाही, तर दोन्ही हाताने वाजवली जाते. 

दरम्यान, पंकजा मुंडे यांचा परळीतून पराभव झाला. पुढेही ही दरी कमी होण्याऐवजी वाढतच गेली आणि आणखीही वाढतच आहे. तसे, ही ओढाताण एका बाजूने नाही, तर दोन्ही बाजूने आहे. अलिकडच्या काळात भाजप व पंकजा मुंडे यांच्यातील घटना अख्खे राज्य पाहतच आहे. पण, झाले ते पुरे म्हणण्याची वेळ आल्याचे सद्यस्थितीवरुन दिसते. 
Edited By  : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com