'निसर्ग' येतेय काळजी घ्या : मुख्यमंत्री ठाकरे

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने झेपावत असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
uddhav thackeray briefs about nisarga cyclone to people
uddhav thackeray briefs about nisarga cyclone to people

मुंबई : राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटानंतर आता हे निसर्ग चक्रीवादळाचे संकट आले आहे. या संकटाच्या छाताडावर चाल करुन आपण त्याला मात देऊ, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बोलून दाखविला. 

निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, ते उद्या राज्यात धडकण्याची शक्यता आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधून खबरदारीच्या सूचना केल्या. ते म्हणाले की, वादळामुळे वाऱ्याचा वेग अधिक असणार आहे. शक्यतो घराबाहेर पडू नका. घरातील जीवनावश्यक वस्तू आणि मौल्यवान वस्तू पिशव्यांमध्ये ठेवा. वादळाच्या काळात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विद्युत उपकरणे बंद ठेवा. घराची दारे आणि खिडक्या बंद ठेवा. 

राज्यातील कोणत्याही नागरिकाला वादळामुळे इजा होऊ नये यासाठी सरकार सज्ज आहे. वादळाची तीव्रता वाढल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला जाईल. अशा वेळी स्थलांतरासाठी प्रशासनाला सहकार्य करा. वादळामुळे विजेसह इतर सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे घरात पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवा. वादळाच्या काळात वाऱ्याचा वेग जास्त असेल त्यामुळे तुम्ही प्रथम सुरक्षित ठिकाणी थांबा आणि त्यानंतर संकटात अडकलेल्या इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

राज्यात चक्रीवादळ उद्या दुपारच्या सुमारास धडकण्याची शक्यता आहे. या वादळाचा मुंबई आणि सिंधुदुर्गला सर्वाधिक धोका आहे. आमची सर्व पथके यासाठी सज्ज आहेत. केंद्र सरकारशीही माझे बोलणे झाले असून, लष्कर, हवाई दल आणि नौदलाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. जनतेला विविध माध्यमातून सरकार वेळोवेळी महत्वाच्या सूचना करणार आहे. आपण सर्व जण संकट परतून लावूयात. तुमच्या धैर्य आणि जिद्दीला माझा मानाचा मुजरा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 

नवी दिल्ली : निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, ते गुजरात आणि महाराष्ट्राकडे वाटचाल करीत आहे. हे वादळ पुढील 24 तासांत मुंबईत धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही याबाबत चर्चा केली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे 11 किलोमिटर प्रतितास वेगाने सरकत आहे. त्याचे चक्रीवादळात रुपांतरीत होण्याची चिन्हे आहेत. पुढील 12 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल आणि त्यानंतरच्या 24 तासांत त्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com