... तर मंत्रीपदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन : पुणे जिल्ह्यातील मोठ्या नेत्याची घोषणा - then I will resign as minister and leave politics says Bharane | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

... तर मंत्रीपदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन : पुणे जिल्ह्यातील मोठ्या नेत्याची घोषणा

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 25 एप्रिल 2021

उजनी धरणातील पाणीवाटपावरून आधीच मराठवाडा विरुद्ध सोलापूर यांच्यात रणकंद सुरु असतानाच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याची प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आहे.

सोलापूर : उजनी धरणातील थेंबभरही पाणी इंदापूरला नेणार नाही. पाणी पळविल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राज्यमंत्री, आमदारकीच नव्हे तर राजकीय संन्यास घेईन, असे आव्हान पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. विरोधकांनी चुकीची माहिती लोकांमध्ये पसरवून बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

उजनी धरणातील पाणी वाटप यापूर्वीच निश्‍चित झालेले आहे. त्यामुळे त्यात आता कोणताही बदल करता येत नाही. परंतु, आपली भूक भागविण्यासाठी दुसऱ्याच्या ताटातील भाकर हिसकाविण्याचे संस्कार माझ्यावर झालेले नाहीत, असे उत्तरही भरणे यांनी दिले. रविवारी (ता. २५) पालकमंत्र्यांनी नियोजन भवनात कोरोनाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सर्व घटकांची मदत गरजेची आहे. जिल्ह्यासाठी इंजेक्‍शन, लस, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन पुरेशा प्रमाणात मिळावेत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. ऑक्‍सिजन असो वा रेमडेसिव्हिरविना कोणता रूग्ण दगावणार नाही, याची खबरदारी प्रशासनातर्फे घेतली जात आहे.

उजनी धरणातील पाणीवाटपावरून आधीच मराठवाडा विरुद्ध सोलापूर यांच्यात रणकंद सुरु असतानाच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याची प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आहे. त्यामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भूमिके विषयी सोलापूर जि्ल्हयातील शेतकर्यांमधून  तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध राजकीय पक्षांनी देखील इंदापूरला पाणी देण्यास विरोध
दर्शवला आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यावरुन सोलापूर विरुद्ध इंदापूर असा नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा नीरा उजव्या कालव्याचे  पंढरपूर, सांगोला तालुक्यासाठी मंजूर असलेलं पाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ता येताच रद्द करुन ते  पु्न्हा बारामतीकडे वळवलं.  अशातच आता उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी उपसा सिंचन योजनेसाठी 5 टीएमसी पाणी देण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाला व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भूमिकेला   सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरु केला आहे.

दोन दिवसांपासून  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली आहे. ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमांच दहन करुन निषेधही व्यक्त जात आहे. याच घटनेचा निषेध म्हणून करमाळा तालुक्यातील शेतकरी आणि महिलांनी  पालकमंत्र्यांच्या प्रतिमेला उजनीच्या पाण्यात जलसमाधी दिली. त्यानंतर आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेने देखील उजनीतून इंदापूर तालुक्याला पाणी देण्यास विरोध केला आहे.

सोलापूर जिल्ह्याची वरदायणी अशी ओळख असलेल्या उजनी धरणातून सोलापूर शहरासह जिल्ह्यातील शेतीला पाणी दिले जाते. परंतु आता  जिल्ह्यातील शेतकर्यांची तहाण भागण्यापूर्वीच उजनीतील  पाण्याची   पळवापळवी  सुरु झाली आहे.  उजनी धरणातून  मराठावाड्याला पाणी देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोळेगाव बंधाऱ्यात  उजनी धरणातून पाणी दिले जाते. त्यामुळे या पाणीवाटपाच्या वादावर भरणे यांची कसोटी लागण्याची शक्यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख