मोदींनी नाव हटवताच ठाकरे सरकारचा राजीव गांधींच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय

केंद्राच्या त्या निर्णयाला शह देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
Thackeray government will give an award in the name of Rajiv Gandhi
Thackeray government will give an award in the name of Rajiv Gandhi

मुंबई : माजी पंतप्रधान (स्व.) राजीव गांधी यांच्या नावाने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोत्तम संस्थेसाठी पुरस्कार देण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या वर्षी 20 ऑगस्ट रोजी पुरस्काराची घोषणा होणार असून तो ३० ऑक्टोबरपूर्वी देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे. (Thackeray government will give an award in the name of Rajiv Gandhi)

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारने क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले होते. त्यामुळे देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस पक्षाकडून त्या निर्णयावरून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने उचललेले हे पाऊल म्हणजे केंद्राच्या त्या निर्णयाला शह देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील सर्वोत्तम संस्थेसाठी राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे. राजीव गांधी यांच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. या वर्षी 20 ऑगस्ट रोजी पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. संबंधित संस्थेला तो ३० ऑक्टोबरपूर्वी देण्यात येणार आहे. पुढच्या वर्षीपासून मात्र राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी म्हणजे 20 ऑगस्ट रोजीच पुरस्कराचे वितरण करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. 

राज्यातील माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम संस्थांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्यासाठी राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राजीव गांधी यांनी माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार व राष्ट्रीय विकासातील त्याचा परिणामकारक वापर यावर भर दिला होता. त्यामुळे राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय मंत्र्यांच्या या बैठकीत घेण्यात आला.

 
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन आणि माहिती तंत्रज्ञान उपविभागामार्फत हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मुंबईतील महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ (महाआयटी) ही संस्था पुरस्कारार्थी संस्थेची निवड करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in