भाजपच्या 105 मध्ये शिवसेनेचे मोठे योगदान 

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत जे 105 चे संख्याबळ गाठले, यामागे शिवसेनेचे योगदान मोठे आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने साथ दिली नसती भाजपला 40 ते 50 जागा मिळूच शकल्या असत्या.
Shiv Sena's big contribution in BJP's 105
Shiv Sena's big contribution in BJP's 105

पुणे : "भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत जे 105 चे संख्याबळ गाठले, यामागे शिवसेनेचे योगदान मोठे आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने साथ दिली नसती भाजपला 40 ते 50 जागा मिळूच शकल्या असत्या,'' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. 

खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज (ता. 11 जुलै) प्रसिद्ध झाला. त्यात 105 आमदाराचं बळ असतानासुद्धा प्रमुख पक्ष सत्ता स्थापन करू शकला नाही. सत्तेवर येऊ शकला नाही, हीसुद्धा एक अजब कला किंवा महाराष्ट्रात चमत्कार होता, याला तुम्ही काय म्हणाल? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. 

या प्रश्‍नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, भारतीय जनता पक्ष 105 पर्यंत कसा पोचला, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. विधानसभा निवडणुकीत ते 105 पर्यंत पोचू शकले, यामध्ये शिवसेनेचे योगदान मोठे आहे. शिवसेना भाजपसोबत नसती किंवा शिवसेनेला त्यामधून वजा केले तर 105 जागांचा आकडा तुम्हाला कुठेतरी 40 ते 50 च्या आसपास दिसला असता. भाजपचे नेते नेहमी सांगत असतात की आम्ही 105 असूनही आमच्या सहकाऱ्याने म्हणजे शिवसेनेने आम्हाला दुर्लक्षित केले किंवा सत्तेपासून दूर ठेवले. पण, त्यांना म्हणजे भाजपला विधानसभेत 105 पर्यंत पोचविण्याचे काम ज्यांनी केले, त्या शिवसेनेलाच गृहीत धरण्याची भूमिका घेतली गेली. त्यामुळे मला वाटत नाही की, इतरांनी वेगळे काही करण्याची आवश्‍यकता होती. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की माझं सरकार गेलं किंवा मी मुख्यमंत्रिपदी नाही, हे पचवणं खूप कठीण गेलं. हे समजून घ्यायलाच दोन दिवस लागले, याचा अर्थ असा आहे की आपली सत्ता कधीच जाणार नाही, या भूमिकेत...सत्तेचा अमरपट्टाच बांधून आलेलो आहोत, या प्रश्‍नावर शरद पवार यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या पराभवाचा दाखला दिला. 

पवार म्हणाले की, "लोकशाहीतला कुठलाही नेता आपण सत्तेचा अमरपट्टा घेऊन आला आहोत, असा विचार करू शकत नाही. या देशातला मतदार गृहीत धरलेले कधीही सहन करत नाही. इंदिरा गांधींसारख्या जनमाणसांत प्रचंड पाठिंबा असलेल्या व्यक्तीलासुद्धा पराभव पाहवा लागला होता. अटलबिहारी वाजपेयी यांचासुद्धा पराभव झाला होता. याचा अर्थ असा आहे की, या देशातील सामान्य माणूस लोकशाहीच्या संदर्भात आम्हा राजकारणातल्या लोकांपेक्षा अधिक शहाणा आहे. आमचं पाऊल चाकोरीच्या बाहेर पडतंय, असं दिसताच तो आम्हालाही धडा शिकवतो. त्यामुळे कोणतीही भूमिका घेऊन बसलो की आम्हीच! ...तर लोकांना ते आवडत नाही.' 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com