सातारा, नगर हे दोन जिल्हे आता `हाॅटस्पाॅट` : कठोर लाॅकडाऊनची अंमलबजावणी

दोन्ही जिल्ह्यांत कडक लाॅकडाऊन
cororna
cororna

पुणे : राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांतून कोरोना रुग्णवाढीचा दिलासा मिळाला असला तरी सातारा आणि नगर हे दोन जिल्हे आता नवीन हाॅटस्पाॅट ठरले आहेत. साताऱ्यात आजपासून कडक लाॅकडाऊन लावण्यात येत आहे. नगरमध्येही तशीची परिस्थिती आहे.

प्रमुख शहरांतील कोरोना रुग्णांची संख्या एक हजारच्या खाली आली आहे. येथील कोरोना सेंटर रिकामे पडत आहेत. त्याचा मोठा दिलासा आरोग्य यंत्रणांना मिळत आहे. मात्र ग्रामीण भागातील रुग्णवाढ आटोक्यात येत नसल्याने प्रशासन चिंतेत आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णवाढीचा कल कमालीचा उतरणीला लागला असला तरी येथेही ग्रामीण भागात अद्याप रोख लागलेले नाही. 

राज्यात गेल्या 24 तासांत करोनाचे २६,६७२ रुग्ण आढळले असून, ५९४ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात मुंबईत १४२७, रायगड ७५०, पुणे शहर ७८६, उर्वरित पुणे जिल्हा १६४४, पिंपरी-चिंचवड ६२७, नगर 1851, नाशिक शहर ४२५, सातारा 2008, सोलापूर १५४८, रत्नागिरी ९२०, अमरावती ८७२, नागपूर शहर ३२६, उर्वरित नागपूर जिल्हा ६७१ नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या ३ लाख ४८ उपचाराधीन रुग्ण आहेत.

कोल्हापूरमध्ये मृत्यूवाढ

राज्यात सर्वाधिक मृतांची संख्या सध्या कोल्हापूर जिल्ह्य़ात असून, गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत कोल्हापूरमध्ये ५३ टक्कय़ांनी मृत्यूसंख्येत वाढ झाल्याचे दिसते. एका आठवडय़ात कोल्हापूर ग्रामीणमध्ये ८४४ मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल बीड (२४ टक्के) सोलापूर (२० टक्के), सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी (१६ टक्के), औरंगाबाद (१५टक्के) मृतांची संख्या वाढली आहे. राज्याच्या एकूण मृत्यूदरातही वाढ झाली असून हा दर १.५० टक्क्यांवरून १.५६ टक्कय़ांवर गेला आहे.

राज्यात बाधितांचे सर्वाधिक प्रमाण साताऱ्यात (३२ टक्के) आहे. त्याखालोखाल परभणी (२७ टक्के), उस्मानाबाद (२६ टक्के), रत्नागिरी (२२ टक्के), सिंधुदुर्ग (२४ टक्के), सांगली (२१ टक्के) आहे.

साताऱ्यातील लाॅकडाऊन असा राहणार....

हे सुरू राहणार.... 
अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने, हॉस्पिटल... 
वृत्तपत्राचे वितरण आणि विक्री 
नियमाधिन राहून रिक्षा व टॅक्‍सी वाहतूक 
दूध घरपोच वितरणास दोन तासांचा अवधी 
खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसेस 
सर्व प्रकारची माल वाहतूक 
शासकिय व खासगी सुरक्षा सेवा 

......................... 
पूर्णपणे बंद 

अत्यावश्‍यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने. 
मटण, चिकन, अंडी विक्रीची दुकाने 
बार, हॉटेल्स, दारूची दुकाने 
एसटीची प्रवाशी वाहतूक 
सर्व खासगी व सहकारी बॅंका 
भाजीपाला, बेकरी, फळविक्री 
नॉन बॅंकिंग वित्तीय महामंडळे 
सर्व प्रकारची बांधकामे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com