संभाजीराजेंनी भाजपच्या खासदारकीला लाथ मारावी : हर्षवर्धन जाधव - Sambhaji Raje should resign as BJP's MP : Harshvardhan Jadhav | Politics Marathi News - Sarkarnama

संभाजीराजेंनी भाजपच्या खासदारकीला लाथ मारावी : हर्षवर्धन जाधव

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

आपल्या गादीचं श्रेष्ठत्व राखावं

सोलापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय जनता पक्ष सोडावा. खासदारकी-आमदारकी यांसारख्या लोकप्रतिनिधीपदांच्या गादीला लाथ मारून आपल्या गादीचं श्रेष्ठत्व राखावं, असे आवाहन कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. (Sambhaji Raje should resign as BJP's MP : Harshvardhan Jadhav)

 
कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी सोलापुरात बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भारतीय जनता पक्ष सोडण्याचा सल्ला दिला आहे. येत्या ९ जुलै रोजी हर्षवर्धन जाधव हे दिल्लीत मराठा आरक्षणासाठी जंतर-मंतर मैदानावर लोकव्यापी आंदोलन करणार आहेत, त्याअनुषंगाने ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरात आले असताना त्यांनी संभाजीराजेंना वरील आवाहन केले.

हेही वाचा : मराठा आरक्षण आंदोलनातील उर्वरित गुन्हेही लवकरच मागे घेणार...
 
माजी हर्षवर्धन जाधव म्हणाले, भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला मराठा आरक्षणाच्या संदर्भात दोनदा फसवले आहे. आजही भाजप मराठा समाजाची फसवणूक करत आहे. अशा परिस्थितीमध्ये नॉन पोलिटिकल अजेंडा घेऊन जर संभाजीराजे छत्रपती आले तर तर येत्या ९ तारखेला होणाऱ्या आंदोलनाला चार चाँद लागतील, अशी अपेक्षाही जाधव यांनी या वेळी व्यक्त केली.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची गादी ही राजकारणापेक्षा मोठी आहे. राजकारणामध्ये आमदार, खासदार होता येतं. पण, शिवछत्रपतींचा वंशज होता येत नाही. त्यामुळे संभाजीराजेंनी खासदारकी आणि आमदारकी सारख्या लोकप्रतिनिधी पदांच्या गादीला लाथ मारून आपल्या गादीचं श्रेष्ठत्व राखून त्यांनी आंदोलनात आले पाहिजे. त्यांनी जर राजीनामा दिला, तर आम्ही त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहोत, असेही कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख