मोठी संधी : म्हाडामध्ये ५६५ जागांवर नोकरभरती; या तारखेपर्यंत भरता येणार अर्ज 

त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये.
Recruitment will be done for 565 posts in MHADA
Recruitment will be done for 565 posts in MHADA

मुंबई  : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) विविध संवर्गातील ५६५ रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. या जागांसाठी पात्र उमेदवारांना १७ सप्टेंबर सकाळी ११ वाजेपासून ते १४ ऑक्टोबरला रात्री २३. ५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. (Recruitment will be done for 565 posts in MHADA)

म्हाडाच्या विविध मंडळातील पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. त्याचा परिणाम प्रशासकीय कामावर होत होता. ही बाब लक्षात घेता म्हाडा प्राधिकरणाच्या प्रशासनाने रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध संवर्गातील एकूण ५६५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

म्हाडामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ जागा, उपअभियंता (स्थापत्य) १३ जागा, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी २ जागा, सहायक अभियंता (स्थापत्य) ३० जागा, सहाय्यक विधी सल्लागार २ जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ११९ जागा, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४ जागा, सहायक १८ जागा, वरिष्ठ लिपिक ७३ जागा, कनिष्ठ लिपिक टंकलेखक २०७ जागा, लघुटंकलेखक २० जागा, भूमापक ११ जागा, अनुरेखकाच्या ७ जाग आदी जागांवर ही नोकरभरती होणार आहे. 

या पदांचा सविस्तर तपशील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर १७ सप्टेंबर सकाळी ११ वाजेपासून उपलब्ध होणार आहे. म्हाडा प्रशासनाने भरती प्रक्रियेसाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व एजंट म्हणून नेमलेले नाही. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही अशा व्यक्तींशी परस्पर व्यवहार करू नये. तसेच, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com