शनिवार व रविवारचा कडक लाॅकडाऊन रद्द : 29 मे पासून लगेच अंमलजावणी - PMC allows to open essential shops on Saturday and Sunday | Politics Marathi News - Sarkarnama

शनिवार व रविवारचा कडक लाॅकडाऊन रद्द : 29 मे पासून लगेच अंमलजावणी

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 28 मे 2021

पुणेकरांना दिलासा मिळण्यास सुरवात

पुणे : पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागल्याने पुण्यातील लाॅकडाऊनही आता शिथिल होऊ लागला आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून शहरातील अत्यावश्यक सेवांची दुकाने आठवडाभरही सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. त्याची अंमलबजावणी तातडीने 28 मे पासूनच होणार आहे. त्यामुळे 29 व 30 मे रोजी पुण्यातील दुकाने सुरू राहणार आहेत. याबाबतचा आदेश पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जारी केला आहे. (PMC lifts weekend lockdown)

राज्यातील लाॅकडाऊन 15 जूनपर्यंत वाढविणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्यानंतर पुण्यातील लाॅकडाऊनचे काय होणार याची उत्सुकता होता. पुण्यात रोज नव्याने कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण 700 च्या खाली आले आहेत. तसेच एकूण अॅक्टिव्ह रुग्णही सुमारे आठ हजार आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोनाची दुसरी लाट शेवटाकडे असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात शनिवार व रविवारी कठोर लाॅकडाऊन होता. तो आजपासूनच म्हणजे 28 मेच्या मध्यरात्रीपासून रद्द झाला आहे. 

ही बातमी वाचा : पुण्यासाठी सुखावणाऱ्या या दोन बातम्या

राज्यातील लॉकडाउन आणखी १५ दिवसांपर्यंत वाढविण्याचा शक्यता आहे. त्याबाबतची नियमावली एक जून रोजी राज्य सरकारकडून जाहीर केले जाणार आहे. हे करताना ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हा कमी आहे. त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंधामध्ये सवलत देण्याचा अधिकार महापालिका आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. इतर व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी मिळणार का हे राज्य सरकारकडून नियमावली जाहीर झाल्यानंतर समोर येणार आहे.

आठवडाभर काय राहणार सुरु?

(वेळी सकाळी ७ ते ११)

- किराणा, भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी, मिठाई, चिकन, मटन, अंडी, मासे विक्री आणि सर्व प्रकाराची खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने

- कृषी संबधित बी, बियाणे, खते, उपकरणे, त्यांच्याशी निगडीत देखभाल दुरुस्ती सेवा ही दुकाने

- पाळीव प्राणी खाद्यांची दुकाने

- पावसाळा हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने

- चष्म्याची दुकाने

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख