'आघाडी सरकार म्हणजे मोघलाईचं राज्य..' प्रविण दरेकरांची टीका

आंदोलकांची भेट दरेकर यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी टि्वटआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
Pravin Darekar.jpg
Pravin Darekar.jpg

मुंबई : "आघाडी सरकारचं मोघलाईचं राज्य सुरु आहे.." अशी टीका विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या तरूणांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची भेट दरेकर यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी टि्वट करून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबतचा व्हिडिओ दरेकर यांनी शेअर केला आहे. 

आपल्या टि्वटमध्ये प्रविण दरेकर म्हणतात, "आघाडी सरकारचं मोघलाईचं राज्य सुरु आहे. आंदोलनकर्त्या मराठा तरुणांवर केसेस दाखल करण्यात आल्या. अधिवेशन चालू असताना लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे.तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका." 

मराठा समाजाच्या तरुणांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला तर त्याठिकाणी मी त्यांच्याबाजूने उभा राहीन व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती सरकारची जबाबदारी असेल, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी  येथे दिला. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या आंदोलकांची दरेकर यांनी भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. 

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीपूर्वीच एसईबीसी गटातून नियुक्त झालेले पण नोकरी न मिळालेले मराठा उमेदवार उपोषणास बसले आहेत. मराठा उमेदवारांना आठ दिवसांत नोकरी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र आठ महिन्यांनंतरही ते पूर्ण झाले नसल्याची टीकाही दरेकर यांनी केली.

मराठा मोर्चासाठी मुंबईत निघालेल्या आंदोलकांना नवी मुंबई, नाशिक येथे अडविले जात आहे. परंतु अश्या प्रकारे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा तरुणांना रोखणे असंवैधानिक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी या तरुणांना अडविले जाईल त्या ठिकाणी मी विरोधी पक्षनेता म्हणून उपस्थित राहीन. सरकारच्या दडपशाहीमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली तर त्याची जबाबदारी सरकारची राहील, असेही दरेकर यांनी सुनावले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com