पवारांनी सूचना करताच राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन कोटींची मदत 

संकटकाळात आपली सामाजिक बांधिलकी जपत पक्ष मदतीसाठी पुढे सरसावला आहे.
NCP provides Rs 2 crore to CM Assistance Fund
NCP provides Rs 2 crore to CM Assistance Fund

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहिताच पक्षाकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला आहे. या रकमेचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी (ता. ३० एप्रिल ) सुपूर्त केला.

कोरोनाविरूद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये, तर पक्षाच्या राज्यातील सर्व विधिमंडळ (विधानसभा आणि विधान परिषद) सदस्य व संसद (लोकसभा, राज्यसभा) सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रकमेचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. 

या वेळी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी मुंबई युवती काँग्रेसच्या अध्यक्ष अदिती नलावडे उपस्थित होत्या.
 
राज्यातील प्रशासन व जनता कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटासोबत जोमाने लढा देत आहे. पण, एकूणच जगभराचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरचा भार अधिक वाढणार आहे. त्यामुळे या संकटकाळात आपली सामाजिक बांधिलकी जपत पक्ष मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्यानुसार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या साहाय्यासाठी पक्षाकडून ही मदत करण्यात आली आहे.


हेही वाचा : हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच पवारांनी लिहिले हे पहिले पत्र...

मुंबई  ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच सर्वप्रथम राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात कोरोनाच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन, तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये इतका मदतनिधी देण्यात यावा, अशी सूचना केली आहे.

कोरोनोच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये इतका मदतनिधी देण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व कोषाध्यक्ष हेमंत टकले यांना दिल्या. दिरंगाई न होता तातडीने ही मदत मिळावी, यासाठी शरद पवार यांनी एका कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरात या सूचना लिहून पाठवल्या आहेत. 

रुग्णालयात असतानाही शरद पवार हे सातत्याने राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत होते. रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सचा तुटवडा असो किंवा लसीकरणातली अडचणीची परिस्थिती असो वा ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधात निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती. रुग्णालयात असतानाही शरद पवार हे रोज परिस्थितीचं अवलोकन करत होते. नव्या आव्हानात्मक परिस्थितीत राज्याच्या तिजोरीवर पडलेला ताण पवार यांच्या ध्यानात आला आणि त्यांनी रुग्णालयातून घरी परतल्यावर पक्ष सहकाऱ्यांना तातडीने मदत निधीसंबंधीच्या सूचना दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com