विजयदादा, बबनदादा, सोपल, परिचारक यांचे `मी पुन्हा येईन`चे स्वप्न भंगणार!

कायदा दुरुस्तीचा थेट फटका महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या तत्कालिन संचालकांना बसणार असल्याने या कायद्यात महाविकास आघाडी सरकारने दुरुस्ती केली.
विजयदादा, बबनदादा, सोपल, परिचारक यांचे `मी पुन्हा येईन`चे स्वप्न भंगणार!
Babandada-vijaydada-mohite

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Solapur DCC Bank) निवडणुकीसाठी ठराव घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि "मी पुन्हा येईन'ची कुजबूज डीसीसीच्या राजकारणात सुरु झाली. बॅंकेचे संचालक मंडळ आरबीआयच्या कलम 110 ए नूसार बरखास्त झाले आहे. राज्य सरकारने 2016 मध्ये सहकार कायद्यात केलेल्या दुरुस्तीमुळे माजी संचालकांना पुन्हा डिसीसीत येण्यासाठी अडचण येऊ शकते. 

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, (Vijaysinh Mohite Patil) आमदार बबनराव (Babandada Shinde) शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल (DiliP Sopal), आमदार संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्यासह डीसीसीच्या राजकारणातील अनेक दिग्गजांना पुन्हा येण्यासाठी कायद्याच्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.

महाराष्ट्राचे तत्कालिन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या सहकार कायद्यात दुरुस्ती करत कलम 110 ए नुसार बरखास्त झालेल्या बॅंकांवर संचालकांना पुन्हा येण्यासाठी दहा वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या कायदा दुरुस्तीचा थेट फटका महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या तत्कालिन संचालकांना बसणार असल्याने या कायद्यात महाविकास आघाडी सरकारने दुरुस्ती केली. 

2016 पूर्वीच्या कारवाईला वगळण्यात आले. 2016 नंतर झालेल्या कारवाईचा विषय सहकार कायद्यात तसाच कायम राहिला आहे. सोलापूर जिल्हा बॅंकेवर 2018 मध्ये तत्कालिन चेअरमन राजन पाटील यांचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. ही कारवाई ज्या वेळी झाली होती त्या संचालक मंडळात असलेल्या संचालकांना सोलापूर डीसीसीत पुन्हा येण्यासाठी कायद्याचा किस पाडावा लागणार हे निश्‍चित. 

नाशिक अन्‌ सोलापूरला द्यावे लागेल तोंड 
कलम 110 ए नूसार 2016 नंतर राज्यातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. त्यामुळे तत्कालिन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या सहकार कायदा दुरुस्तीला राज्यात सर्वात प्रथम नाशिक आणि सोलापूर डीसीसीच्या माजी संचालकांना तोंड द्यावे लागणार आहे. सोलापूर डीसीसीच्या निवडणुकीसाठी मतदार ठराव करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. साधारणता नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये सोलापूरच्या जिल्हा बॅंकेची निवडणूक होईल अशीच शक्‍यता आहे. 

भाजपची वाढली ताकद 
सोलापूर डीसीसीवर आजपर्यंत राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शेकापच्या नेत्यांची वर्णी लागत होती. भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे डीसीसीवर येत होते. 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपध्ये सोलापूरच्या नेत्यांचे झालेले इनकमिंग, भाजपची जिल्ह्यात वाढलेली ताकद पाहता डीसीसीच्या आगामी निवडणूकीत भाजपची सदस्य संख्या वाढणार हे निश्‍चित मानले जात आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in