महाआघाडी जोरात; पुणे, नागपूरसह चार ठिकाणचे उमेदवार आघाडीवर 

अरुण लाड यांना सुमारे 10 हजार मतांची आघाडी असल्याची माहिती आहे.
mahavikas Aghadi loud; Leading candidates from four places including Pune and Nagpur
mahavikas Aghadi loud; Leading candidates from four places including Pune and Nagpur

पुणे : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणीस सुरुवात झाली असून पहिल्या टप्पात पाचपैकी चार ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. एका ठिकाणी अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. भाजपचे उमेदवार पहिल्या टप्प्यात तरी पिछाडीवर आहेत. धुळे-नंदूरबारच्या पोटनिवडणुकीत मात्र अमरिश पटेल यांच्या रुपाने भाजपने सकाळीच खाते उघडले होते. 

पुणे पदवीधर मतदारसंघातून पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यावर आघाडी घेतली आहे. लाड यांना सुमारे 10 हजार मतांची आघाडी असल्याची माहिती आहे. कॉंग्रेसचे जयंत आसगावकर हे शिक्षक मतदारसंघातून सुमारे चार हजार मतांनी पुढे असल्याची माहिती आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत दुसऱ्या स्थानावर, तर भाजपचे जितेंद्र पवार हे तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती आहे. 

औरंगाबाद पदवीधर मतदासंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण हे आघाडीवर आहेत. पोस्टल मतांमधून 600 मते चव्हाण यांना मिळाली असून भाजचे शिरीष बोराळकर यांना 286 मते मिळाली होती. पोस्टल मतांमध्ये चव्हाण यांनी 314 मतांची आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत चव्हाण यांना 27 हजार 879 मते मिळाली असून भाजपचे शिरीष बोराळकर यांना 10 हजार 973 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीअखेर चव्हाण यांनी 16 हजार 906 मतांची आघाडी घेतली आहे. 

नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. पण, त्या ठिकाणीही कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी हे सुमारे 3000 मतांनी पुढे असल्याची माहिती आहे. या मतदासंघातून भाजपने नागपूरचे विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमदेवारी दिली होती. 

अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक हे 3131 मतांनी आघाडीवर आहेत. ही एकमेव जागा महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला आली होती. शिवसेनेने त्या ठिकाणी श्रीकांत देशपांडे यांना उमेदवारी दिली होती. परंतु देशपांडे हे पहिल्या फेरीतच पिछाडीवर पडले आहेत. या ठिकाणी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या बहिणींनी बंडखोरी केली होती, त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारपेक्षा जादा मते प्राथमिक कलांमध्ये घेतली आहेत. 

धुळे-नंदूरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांनी 234 मतांनी विजय मिळविला असून त्यांना एकूण 332 मते मिळाली आहेत, तर कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित पाटील यांना केवळ 98 मते मिळाली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com