लॉकडाउन वाढला पण...जिल्हांतर्गत बस वाहतूक, दुकाने सुरू

राज्यातील लॉकडाउन 30 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने रविवारी जाहीर केला. राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
maharashtra state government announces fifth lockdown
maharashtra state government announces fifth lockdown

मुंबई : अत्यावश्यक सेवा वगळता सामान्य नागरिकांना रात्री 9 ते पहाटे 5 या वेळेत घराबाहेर पडण्यास मनाई असणार आहे. याचबरोबर 65 वर्षांवरील नागरिक, गर्भवती आणि दहा वर्षांखालील लहान मुलांना घराबाहेर पडण्यास मनाई असेल. याचबरोबर जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी केवळ क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांची अट असेल. आंतरजिल्हा बस सेवा बंद राहणार असून, याबाबतचा आदेश स्वतंत्ररित्या काढण्यात येणार आहे. 

कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ जीवनावश्यक सेवा 

कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. या झोनमध्ये नागरिकांना वैद्यकीय कारण वगळता इतर बाबींसाठी घराबाहेर पडण्यास मनाई असेल. याचबरोबर या झोनमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सरकार योग्य तो निर्णय घेईल. 

मिशन बिगिन अगेन 

मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांच्या हद्दीत लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार आहे. 

पहिला टप्पा 3 जूनपासून 

- सार्वजनिक ठिकाणी सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मैदाने, बागा, किनार खुले होणार आहेत. मात्र, इनडोअर स्टेडिअमला परवानगी देण्यात आलेली नाही. यासाठी सकाळी 5 ते सायंकाळी 7 ही वेळ असेल. गटाने फिरण्यास मनाई असेल आणि मुलांसोबत वडिलधाऱ्या व्यक्तींनी असणे आवश्यक असेल. 
- प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि इतर टेक्निशियनना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क व सॅनिटायझरच्या वापरासह परवानगी 
- आधी अपॉइंटमेंटसह गॅरेज आणि वर्कशॉप खुली 
- सर्व सरकारी कार्यालये 15 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू 

दुसरा टप्पा 5 जूनपासून 

- मॉल आणि व्यापारी संकुले वगळता बाजारपेठा, दुकाने पार्किंगच्या सम-विषम नियमानुसार सकाळी 9 ते सायंकाळी 5 सुरू 
- कपड्यांच्या दुकानांमधील ट्रायलरुम बंद 
- कपडे बदलून घेणे अथवा परत देणेही बंद 
- सोशल डिस्टन्सिंगची जबाबदारी दुकानदारावर 
- केवळ अत्यावश्यक सेवांसाठी रिक्षा, कॅब, दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर 

तिसरा टप्पा 8 जूनपासून 

- सर्व खासगी कार्यालये 10 टक्के मनुष्यबळासह सुरू 

हे राहणार बंद 

- आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतूक 
- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था 
- आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 
- मेट्रो रेल्वे 
- रेल्वे व देशांतर्गत हवाई वाहतूक 
- चित्रपटगृहे, जिम, जलतरण तलाव, एंटरटेन्मेंट पार्क, नाट्यगृहे, बार, प्रेक्षागृहे 
- सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम 
- धार्मिक स्थळे 
- सलून, ब्युटी पार्लर 
- शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरन्ट 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com