अडचणीत सापडलेल्या चित्रपटसृष्टीला सरकारकडून अखेर दिलासा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. याचा फटका चित्रपटसृष्टीलाही बसला आहे. सरकारने आता अडचणीत सापडलेल्या चित्रपटसृष्टीला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
maharashtra government allows film shooting
maharashtra government allows film shooting

मुंबई : लॉकडाउनमधील निर्बंधांमुळे चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण बंद करावे लागले होते. याचा फटका पडद्यावरील कलाकारांसोबत पडद्यामागील कलाकारांना मोठ्या प्रमाणात बसला होता. यामुळे मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकाकास्टिंग फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या अडचणी मांडल्या होत्या. यावर राज्य सरकारने अखेर सकारात्मक निर्णय घेऊन चित्रीकरणास  काही अटींसह परवानगी दिली आहे.  

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे  चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती. ती आता पुन्हा सुरू होणार आहे. यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने आज शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी  मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व शर्तींसह मान्यता देण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे. 

निर्मात्यांना निर्मिती पूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे राज्य सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येतील. सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार निर्मात्यांना काळजी घेऊन चित्रीकरण करावे लागेल. त्यांचा भंग केल्यास काम बंद करण्यात येईल, असेही राज्य सरकारने म्हटले आहे. कोविड-19 संदर्भात लागू केलेल्या प्रतिबंधात्मक   सूचना चित्रीकरणासाठी लागू राहणार आहेत.   

चित्रीकरणाच्या परवानगीसाठी मुंबईतील निर्मात्यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ , दादासाहेब फाळके चित्रनगरी , गोरेगाव येथे अर्ज करावा लागेल. उर्वरित जिल्ह्यांसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज चित्रीकरणासाठी परवानगी घेता येणार आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीला शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू आमदार कपिल पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत रघुनाथ माशेलकर, डॉ अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षणतज्ञही उपस्थित होते. या बैठकीत शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबतच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. शाळा जूनपासून सुरू करू नयेत मात्र, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात करता येईल. हे शिक्षण सुरू करण्यासाठी सोईनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतींचा वापर करावा, असा महत्वाचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com