राजीव सातव यांची पत्नी प्रदेश उपाध्यक्ष : काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

माजी आमदार माणिक जगताप यांची कन्या स्नेहल जगताप ह्या सर्वात तरुण आहेत.
राजीव सातव यांची पत्नी प्रदेश उपाध्यक्ष : काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर
Maharashtra Pradesh Congress jumbo executive announced

मुंबई : नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पाच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज अखेर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जंबो कार्यकरिणी घोषित केली. यामध्ये १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, 104 सेक्रेटरी आणि सहा प्रवक्तांचा समावेश आहे. या कार्यकारिणीत महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांची कन्या स्नेहल जगताप ह्या सर्वात तरुण आहेत. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Maharashtra Pradesh Congress jumbo executive announced)

पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रदेश कार्यकारिणीची राज्यातील नेतेमंडळींपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना प्रतीक्षा होती. तब्बल पाच महिन्यांनंतर पटोले यांची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आहे.  यात कार्यकारिणीत उपाध्यक्ष, खजिनदार, जनरल सेक्रेटरी, सेक्रेटरी, प्रवक्ते, विशेष निमंत्रित सदस्य यांचा समोवश असलेली २२० जणांची ही कार्यकारिणी आहे. यामध्ये दोन ट्रासजेंडर व्यक्तींचाही समावेश आहे. कार्यकारिणीत ४८ विविध समाजाला स्थान देण्यात आलेले आहे.   

या कार्यकारिणीचे सरासरी वय 52 असून सत्तर वय असलेल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. माजी आमदार माणिक जगताप यांची मुलगी स्नेहल जगताप या कार्यकारिणीत सर्वांत तरुण असून त्या 30 वर्षांच्या आहेत. माणिक जगताप यांचे निधन झाले, त्यांची मुलगी स्नेहल यांना संधी देण्यात आली आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राजीव सातव यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले होते. 

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याशी पंगा घेणारे आशिष देशमुख यांच्यावर जनरल सेक्रेटरीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आशिष यांचे वडिल रणजित देशमुख यांनी प्रदीर्घ काळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्या वारसाला आता प्रदेश कार्यकारिणीत संधी मिळाली आहे.  

वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांचे भाऊ आणि आमदार धीरज देशमुख यांचीही जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचे चिरंजीव शैलेश शिवराज पाटील चाकूरकर यांनाही जनरल सेक्रेटरी म्हणून पक्षाने संधी दिली आहे.

सांगली जिल्ह्याचा काँग्रेसचा अध्यक्ष वीस वर्षांनंतर बदलण्यात आलेला आहे. सांगलीच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार विक्रम सावंत यांची निवड करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे शहर काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी रमेश बागवे यांना कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा आता थांबली आहे. बागवे यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष आता निवडणुकीला सामोरा जाणार असल्याचे आज स्पष्ट झाले. रात्री उशिरा प्रदेश कार्यकारिणीची नावे जाहीर झाली. पिंपरी-चिंचवडसाठी मात्र पक्षाला चेहरा मिळू शकला नाही.  

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज जाहीर केलेल्या कार्यकारिणीत पुण्यातील सात जणांना स्थान मिळाले आहे. यात कार्यकारी समितीत ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांची तर सरचिटणीसपदी अभय छाजेड, रोहित टिळक आणि वीरेंद्र किराड यांची नियुक्ती झाली आहे. गोपाळ तिवारी आणि दीप्ती चवधरी यांची चिटणीस म्हणून संधी मिळाली आहे. माजी आमदार अनंत गाडगीळ यांची प्रदेश प्रवक्ते म्हणून निवड झाली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in