राजू शेट्टी, भिंगे, मातोंडकर यांच्या निवडीस तांत्रिक अडसर? अजित पवारांनी सांगितला मार्ग...

राष्ट्रवादीच्या यादीतून देण्यात आलेल्या दोन नावांबाबत प्रश्न निर्माण होऊ शकते.
The loser is not appointed to the Legislative Council? Ajit Pawar told way
The loser is not appointed to the Legislative Council? Ajit Pawar told way

मुंबई : नजिकच्या निवडणुकीत एखादी व्यक्ती जर पराभूत झाली असेल तर त्या व्यक्तीला विधान परिषदेवर नेमले जात नाही? या माहितीमध्ये कितपत तथ्य आहे? आहे की नाही? याची शहनिशा आम्ही करत आहोत. जर त्याच्यात काही अडचण आली, तर त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. (The loser is not appointed to the Legislative Council? Ajit Pawar told way)

विधान परिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची काल भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादीतील काही नावांवर राज्यपालांनी आक्षेप घेतल्याची चर्चा असून त्यात ईडीकडून चौकशी सुरू असलेले एकनाथ खडसे आणि विविध आंदोलनाचे गुन्हे दाखल असलेल्या राजू शेट्टींच्या नावांचा समावेश असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडून शेट्टी यांचे नाव यादीतून मागे घेतल्याची चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, मागील निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर राष्ट्रवादीच्या यादीतून देण्यात आलेल्या दोन नावांबाबत प्रश्न निर्माण होऊ शकते. राष्ट्रवादीच्या यादीतून सूचविलेल्या नावांमध्ये माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रा. यशपाल भिंगे यांचा मागील निवडणुकीत पराभव झालेला आहे. शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्याकडून पराभव झाला आहे. 

दुसरीकडे, प्रा. भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. तसेच शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांचे नाव विधान परिषदेसाठी सूचविण्यात आलेले आहे. त्यांनीही काँग्रेसकडून मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली होती, त्यात त्या पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडून शिवबंधन हाती बांधले होते. शिवसेनेत आल्यानंतर त्यांची विधान परिषदेच्या जागेसाठी राज्यपालांकडे शिफारस करण्यात आली होती.

आता पराभूतांच्या नियुक्तीचा मुद्दा अडवा येत असेल तर महाविकास आघाडीला ही नावे मागे घ्यावी लागतील. तत्पूर्वी कायद्याच्या कसोटीवर ही नावे बसविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असेल. महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून काही पराभूत उमेदवारांना विधान परिषदेवर घेण्यात आल्याचा दाखला दिला जात आहे. गोपीचंद पडळकर यांचा सांगली लोकसभेला पराभव झाला, त्यानंतर त्यांना भाजपत घेऊन बारामतीतून तिकिट देण्यात आले. त्या ठिकाणीही त्यांचा पराभव झाला. त्याउपरही त्यांना विधान परिषदेवर भाजपकडून संधी देण्यात आलेली आहे. ते कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांचा कोरेगावात पराभव होऊनही त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आलेली आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com