एकनाथ खडसे म्हणत असतील, उगीच तो रिपोर्ट सापडला.... - Khadse may be say why that report was found .... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

एकनाथ खडसे म्हणत असतील, उगीच तो रिपोर्ट सापडला....

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 14 जुलै 2021

या अहवालासाठी खडसे जंगजंग पछाडत होते... 

मुंबई :  माजी मंत्री एकनाथ खडसे ज्या अहवालासाठी जंगजंग पछाडत होते तो अहवाल `गहाळ` झाला, अशी आवई उठली. नंतर तो अहवाल मुख्यमंत्री कार्यालयातच असल्याचे स्पष्ट झाले. तो अहवाल मिळावा म्हणून खडसेंनी अनेक अधिवेशनात प्रश्न विचारले. पण त्याचे उत्तर मिळाले नाही. शेवटी तो अहवाल फुटला आणि डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ खडसेंवर त्यामुळे आली असले. कारण या अहवालात खडसे यांच्यावर ताशेरे मारले असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. (Zoting Commitee report may brings trouble for Khadse)

वाचा ही बातमी : पंधरा महिन्यांत मुख्यमंत्र्यांचे पाय मंत्रालयाला लागले नाहीत...

भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार खडसे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला आहे. पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीष चौधरी यांना भोसरी येथील एमआयडीसीची जमीन विकत घेता यावी यासाठी खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे ताशेरे यात मारण्यात आले आहेत.

'टाईम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात हा दावा करण्यात आला आहे. हा अहवाल गहाळ झाल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला होता. तो अहवाल नंतर मुख्यमंत्री कार्यालयातच सापडला आहे. खडसे यांना या जमीन व्यवहारावरून आपले मंत्रीपद गमवावे लागले होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी 2016  मध्ये समितीची स्थापना केली होती.

खडसे यांच्या जावयाची चौकशी ईडीने सुरू केली आहे. खडसे यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. या अहवालानंतर खडसे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हा अहवाल खडसेंवर ताशेरे ओढणारा असेल तर कायदेशीरदृष्ट्या ईडीची बाजू वरचढ ठरू शकते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख