पंढरपूर : यंदाचे नववे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन येत्या 21 व 22 डिेसेंबर रोजी मुंबईतील जुहू चौपाटी जवळ होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बावीस्कर हे उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून मोजकी संत मंडळी हजर राहणार आहेत, अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील यांनी दिली.
सर्वसामान्य लोकांना संत साहित्याची ओळख व्हावी, यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी संत साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या वारकरी महाराज मंडळींच्या उपस्थितीत आॅनलाइन पध्दतीने संत साहित्य संमेलन घेण्यात आले आहे.
संमेलनासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्य मंत्री अमित देशमुख, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
माजी आमदारांकडूनही होणार वसुलीhttps://t.co/gOebQWph7R
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 20, 2020
यावेळी ज्येष्ठ सिनेकलावंत अमिताभ बच्चन यांनी गायिलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रसायदान आडीओचे अनावरण करण्यात येणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने 21 डिसेंबर रोजी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या सुरेश भक्ती गीत गायन मैफीलीचे आयोजन कऱण्यात आले आहे. संमेलनाच्या निमित्ताने संत साहित्याची समाजाला किती गरज आहे. 'पर्यावरण मानवतेसाठी आवश्यक' या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे, असे विठ्ठल पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री आज कोणती नवी घोषणा करणार?
मुंबई : कोरोनाने ग्रासलेले वर्ष संपत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज समाजमाध्यमांवरुन राज्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. आगामी नाताळचा सण व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोणती घोषणा करणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. एका बाजूला राज्यातली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काही नवे निर्बंध लादले जातील काय, याबाबत सर्व पातळ्यांवर उत्सुकता आहे. आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील. त्यातून काय निष्पन्न होते याकडे प्रशासन व नागरिकांचे लक्ष लागले आहे.मुंबईत कांजुरमार्ग येथील मेट्रो कारशेडला हायकोर्टाकडून मिळालेल्या स्थगितीने राज्य सरकारला झटका बसला आहे. त्यातच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघाडीत सगळे काही ठीकठाक असल्याचे दिसत नाही. या दोन्ही मुद्द्यांवरुन विरोधक सरकारची व विशेषतः शिवसेनेची कोंडी करत आहेत. त्यामुळे आजच्या भाषणातून मुख्यमंत्री विरोधकांना काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.

