पवार-शिंदे यांच्यात कोणता करार झाला होता, हे मला माहीत नाही

सुशीलकुमार शिंदे यांचा आदर ठेवून सोलापुरात राष्ट्रवादी वाढवू.
I don't know what was the agreement between Sharad Pawar and Sushilkumar Shinde : Jayant Patil
I don't know what was the agreement between Sharad Pawar and Sushilkumar Shinde : Jayant Patil

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यात सोलापूर शहर व जिल्ह्यात कोणता अलिखित करार झाला होता, हे मला माहिती नाही. सुशीलकुमार शिंदे हे ज्येष्ठ आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातही मी काम केले आहे. त्यांचा आदर ठेवून आम्ही सोलापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढवू, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. (I don't know what was the agreement between Sharad Pawar and Sushilkumar Shinde : Jayant Patil)
 
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे एकेकाळचे समर्थक असलेले शिवसेना नगरसेवक महेश कोठे व एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांच्या नातेवाईकांचा व समर्थकांनी आज (ता. १७ जुलै) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला. त्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. 

सोलापूर शहरामध्ये विविध जातीचे व विविध धर्माचे लोक राहतात. राष्ट्रवादी कॉंग्रेस या सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. राज्यातील सत्तेच्या माध्यमातून सोलापूरला भेडसावणारे प्रश्‍न प्राधान्याने सोडविले जातील, असे आश्वासनही त्यांनी या वेळी बोलताना दिले. 

राष्ट्रपतिपदाबद्दल वावड्या उठविल्या जात आहेत

ज्येष्ठ नेते शरद पवार हे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असतील का? त्यासाठी बैठका आणि भेटीगाठी सुरू झाल्या आहेत का, संदर्भात विचारले असता प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, सध्या आमच्यासमोर राष्ट्रपतिपदाच्या निवडीचा कोणताही विषय नाही. या संदर्भात फक्त वावड्या पसरविल्या जात आहेत. तुमचा गैरसमज नको. शरद पवार यांच्या राष्ट्रपतिपदाबद्दल वावड्या पसरविल्या जात असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. 

बॅंकिंग प्रश्नांसंदर्भात पवार मोदींना भेटले  

देशातील बॅंकांवर पूर्वी नाबार्डचे नियंत्रण होते. नंतर आरबीआयचे नियंत्रण आले. आता या बॅंकांवर आणखीन नवीन नियंत्रण आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. देशातील बॅंकिंग क्षेत्राचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले होते, अशी माहितीही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली. 

 
चंद्रकांत पाटलांच्या इशाऱ्यावर ईडी, सीबीआय चालते 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्यावर व सांगण्यावर ईडी व सीबीआय काम करत असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. देशातील ज्या राज्यात भाजप विरोधी पक्षांची सत्ता आहे. त्या ठिकाणचे सरकार पाडण्यासाठी भाजप ईडी आणि सीबीआयचा वापर करत आहे, असा हल्लाबोलही पाटील यांनी भाजपवर केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com