`भास्कर जाधव यांचा आवाजच `रावडी राठोड` सारखा! मला राग आलेला नाही..`

जाधव यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता...
Chiplun pur
Chiplun pur

चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण (CM Uddhav Thackeray visits flood affected Chiplun city) दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचे  एका महिलेला दिलेले उत्तर सोशल मिडियात चर्चेत आले होते. जाधव हे उद्दामपणे बोलल्याचा अनेकांचा आरोप होता. मात्र आपण वडिलकीच्या नात्याने तसे बोलल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संबंधित महिलेनेही जाधव यांच्या बोलण्याचा राग आला नसल्याचे सांगितले आहे. भास्कर जाधव यांचा आवाजच रावडी राठोडसारखा आहे. त्यामुळे तुम्हाला ती अरेरावी वाटली असेल. भास्कर जाधवांशी आमचे चांगले संबंध आहेत, असे या महिलेने म्हटले आहे. 

दोन्ही बाजूंनी अशी स्पष्टीकरणे आली असली तरी भाजपने आज सर्वत्र राज्यभर जाधव यांच्याविरोधात आंदोलन केले. तसेच तेथील स्थानिक नेत्यांनीही जाधव यांच्या टीका सुरूच ठेवली. 

मुख्यमंत्री ठाकरे हे चिपळूण येथे आले असता एका महिलेने एका महिलेनं आपले म्हणणे रडून सांगितले. त्या महिलेचा आक्रोश माध्यमांच्या कॅमेऱ्याने टिपला. "काहीही करा, पण आम्हाला मदत करा, फुल ना फुलाची पाकळी तरी द्या. आमदारांचा दोन महिन्यांचा पगार मदतीसाठी फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या." त्यांच्या या उत्तरावर जाधव यांनी आमदारांचे सहा महिन्यांचा पगार दिला तरी हा प्रश्न सुटणार नसल्याचे त्यांच्य नेहमीच्या मोठ्या आवाजात सांगितले आणि मुख्यमंत्र्यांना चला, चला, असे म्हणत तिथून काढले. आईची काळजी घे रे, असे सांगायलाही जाधव विसरले नाहीत. या साऱ्या प्रकारामुळे जाधवांच्या विरोधात टिकेचे रान उठले.

त्यावर जाधव यांनी स्पष्टीकरण दिले. ``राज्याचे मुख्यमंत्री उद्धववब ठाकरे यांनी चिपळूणमध्ये पूरस्थितीनंतर झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पुरामुळे झालेले नुकसान आणि प्रचंड हाल यामुळे येथील सामान्य नागरिक, व्यापारी यांच्यामध्ये साहजिकच तीव्र संतापाची भावना होती. मुख्यमंत्री शहरात येताच नागरिकांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. अशावेळी लोकांची मानसिकता आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मी स्वतः रस्त्यावर उतरलो. लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. निसर्ग व तौक्ते वादळानंतर कधी नव्हे एवढी मदत मा. उध्दवसाहेब यांनी केली. त्यामुळे यावेळीसुद्धा ते मदत देताना ते हात आखडता घेणार नाहीत, हे पटवून दिले. व्यापारी आणि सामान्य नागरिकांनाही ते पटले आणि त्यांनी रस्ता मोकळा करून दिला.`` असे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच महिलेसोबत झालेल्य वादावर आपण वडिलकीच्या नात्याने बोलल्याचे माध्यमांशी सांगितले. 

संबंधित महिलेचे नाव ज्योती भोजने असे आहे. त्यांनी देखील भास्कर जाधव यांच्या बोलण्याचा आपल्याला राग आलेला नसल्याचे स्पष्ट केले. जाधव हे नेहमी सगळ्यांना मदत करतात. त्यांचं बोलणंच तसं आहे. पण त्यांचा उद्देश काही वाईट नव्हता. ते वडीलकीच्या नात्यातून आपल्याशी तसं बोलले," असे त्या  म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com