...म्हणून देशमुखांच्या निवास्थानी दुसऱ्यांदा आले सीबीआयचे अधिकारी - Former Home Minister Anil Deshmukh's house was raided by the CBI | Politics Marathi News - Sarkarnama

...म्हणून देशमुखांच्या निवास्थानी दुसऱ्यांदा आले सीबीआयचे अधिकारी

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला होता.

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला होता. देशमुख यांचे मुंबई, नागपूर येथील दहा ठिकाणी सीबीआयने छापे टाकले होते. शंभर कोटी गैरव्यवगारप्रकरणी अनिल देशमुख यांची त्या आधी सीबीआयने तब्बल १० तास चौकशी केली होती.

देशमुख यांच्या नागपुरातील निवास्थानी तपासणी व चौकशी करुन विघून गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना मार्गात जुन्या संगणक, लॅपटॅापची आठवण झाली अन् ते पुन्हा परतले. दुसऱ्यांदा परत जाताना त्यांनी देशमुख यांच्याकडील जुने संगणक, लॅपटॅापच्या हार्डडिस्टची तपासणी करुन त्या ताब्यात घेतल्या, असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

हे ही वाचा : मोदी-ठाकरे सरकार हे पाहा: बेड मिळेना, ऑक्सिजन संपलेला; तीन दिवसांत मृत्यूदरात एक टक्का वाढ

११ तास चौकशी करणारे सीबीआयचे पथक देशमुख यांच्या निवास्थानाहून बाहेर पडल्यानंतर लगेच अर्धा तासाने पुन्हा कशासाठी परतले, नंतरच्या दोन तासांत त्यांनी कोणती चौकशी केली आणि काय सोबत नेले, असे विविध प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर खास सूत्रांकडून वरील माहिती मिळाली. 

परत जाताना अधिकारी आपसात चर्चा करताना घरात काही जुने संगणक, लॅपटॅाप पडले होते, त्याची आठवण झाली, त्यातमुळे पुन्हा पाच अधिकारी एका वाहनात आले आणि त्यांनी ते संगणक, लॅपटॅापची तपासणी केली. त्यांच्या हार्डडिक्स आणि अन्य काही पार्ट ताब्यात घेतले, नंतर ९ च्या सुमारास पथक निघून गेले. 

दुसऱ्या वेळी जेव्हा अधिकारी देशमुख यांच्या निवास्थानी धडकले तेव्हा आता काही तरी वेगळी कारवाई होणार, असी चर्चा सर्वत्र सुर झाली. त्याचमुळे देशमुखांच्या निकटस्थ मंडळींनी निवास्थानासमोर जमायला सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या वेळीदेखील अधिकाऱ्यांचे पथक निघून गेल्याने ते पुन्हा येतील, असा अंदाज बांधत मध्यरात्री १ वाजेपर्यंत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिघींसह अनेक जण तेथे उपस्थित होते. 

हे ही वाचा : कोरोनामुळे मंदिरे बंद : सतेज पाटील, महादेवराव महाडिक यांच्यापुढे वेगळीच अडचण!
 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागले होते. राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला १००  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे त्या पत्रात म्हटले होते. 

अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना (Sachin Waze) निधी गोळा करण्यासाठी सांगत, असे आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रात केले होते.

Edited By - Amol Jaybhaye   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख