'इतक्या' लाख जणांनी केली घरपोच दारू खरेदी... 

पंधरा दिवसात 6 लाख 68 हजार 645 नागरिकांनी घरपोच दारू खरेदी केली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
wine shop
wine shop

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य सरकारने घरपोच मद्यविक्री सुरू केली आहे.  राज्यातील मद्यविक्रीची दुकाने दीड महिने बंद ठेवण्यात आली होती. राज्याच्य़ा महसूल बुडत असल्याने मद्यविक्री सुरू करण्यात आली. पण ग्राहकांची गर्दी लक्षात घेता, ही मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली. राज्य उत्पादक शुल्क विभागाने ऑनलाईन नोंदणी करून मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. यानुसार ता. 15 मे पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसात 6 लाख 68 हजार 645 नागरिकांनी घरपोच दारू खरेदी केली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. 

रविवारी दिवसभरात 63 हजार 962 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि  मुंबई उपनगरात 41 हजार 534 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा  देण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्य सरकारने 3 मे पासून राज्यात मद्यविक्रीबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. यात घरपोच दारू विक्रीस परवानगी देण्यात आली होती. ऑनलाईन परवाना घेण्यासाठी अडचणी येत असल्याने राज्य उत्पादक विभागाने तांत्रिक अडचणी दुर करून संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे या प्रक्रियेत सुधारणा करून ऑनलाईन परवाने प्रक्रिया सुलभ केली. 

ता. 1 मे ते 30 मे या काळात 1 लाख 18 हजार 951 ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी 1 लाख 08 हजार 085 ग्राहकांचे परवाने मंजूर करण्यात आले आहे. ता. 30 मे रोजी राज्यात 173 गुन्हे नोंदविण्यात आले असून 51 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 34 लाख 36 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेकायदा दारू विक्री रोखण्यासाठी राज्याच्या सीमावर तपासणी करण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 6,964 गुन्हे नोंदविण्यात आले. 3 हजार 197 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 651 वाहने जप्त करण्यात आली. 18 कोटी 19 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना

मद्यविक्रीसाठी काही अटीवर मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री परवानगीसाठी अर्ज करण्यात आले होते. यापैकी 7 हजार 207 जणांना परवनागी देण्यात आली.  राज्यात ता. 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली आहे. ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com