वीज सतत खंडित झाल्यास  अधिकाऱ्यांवर कारवाई... 

वीजग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. त्यात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये, असे राऊत यांनी सांगितले.
3nitin_20raut
3nitin_20raut

पुणे : सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यास संबंधीत जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला. 


पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध कामांचा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यावेळी उपस्थित होते. 

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, ''कोरोना विषाणूच्या सावटामुळे बंद असलेले व्यवसाय, उद्योग हळूहळू सुरु होत आहेत. याबरोबरच शासकीय व खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम देखील सुरु आहे. सध्या उन्हाळा असल्याने अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्याची अत्यंत गरज आहे. ज्या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे त्याची गंभीर दखल घेऊन संबंधीत जबाबदार व अकार्यक्षम कर्मचारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा अशा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. वीजग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. त्यात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये, असे राऊत यांनी सांगितले.

या आढावा बैठकीत महावितरणचे कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) पी. के. गंजू, प्रभारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे, पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे (बारामती), सचिन तालेवार (पुणे), श्री. अंकुर कावळे (प्रभारी, कोल्हापूर) आदींसह पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ अभियंते, अधिकारी यांची उपस्थित होते.

‘एक गाव- एक दिवस’ 

बारामती परिमंडलामध्ये ‘एक गाव- एक दिवस’ हा वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचा, नवीन वीजजोडणी व वीजबिल दुरूस्ती मोहिमेचा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाचे डॉ. राऊत यांनी कौतुक केले. हा उपक्रम राज्यभरात राबविण्याचे त्यांनी निर्देश दिले. सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी राज्यभरात कंत्राटदार नेमण्यात आले आहे. या कंत्राटदारांकडून तत्परतेने किंवा आवश्यकतेनुसार समाधानकारक कामे होत नसल्यास किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे खंडित वीजपुरवठ्याचा कालावधी वाढत असल्यास अशा कंत्राटदारांविरुद्ध ताबडतोब कारवाई करण्यात यावी. त्यांचा काळ्या यादीत समावेश करावा, अशी सूचना यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिली. 

ही बातमी वाचा : पालकांशी संवाद साधल्यानंतर 'हा' निर्णय  

मुंबई : विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा शैक्षणिक सत्र सुरु करतानाचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. त्याबाबत पालकांशी चर्चा करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्यातल्या पालक संघटनांशी आम्ही संवाद साधून त्या बद्दलचे निर्णय घेतले जाणार आहे. शिक्षक आमदारांशी आपण संवाद साधला आहे. येत्या सोमवारी विरोधी पक्षांशीही याबाबत संवाद साधणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या वर्षी माणुसकी या धाग्यावर सर्व व्यवहार होतील असे सांगितले. हे दोघेही महासेवा या रमेश प्रभू आणि करण नाईक यांनी सुरू केलेल्या संवादात बोलत होते.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com