भालकेंचा पराभव करत आवताडेंनी राष्ट्रवादीचा गड केला नेस्तानाबूत 

गेली अकरा वर्षे भगिरथ यांचे वडील आमदार भारत भालके या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.
BJP's Samadhan Avtade wins Pandharpur by-election
BJP's Samadhan Avtade wins Pandharpur by-election

पंढरपूर  ः  राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाकडून प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या आणि अत्यंत चुरशीने झालेल्या पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांचा 3716 मतांनी पराभव करत हा मतदारसंघ भालके यांच्या ताब्यातून हिसकावून घेतला आहे. गेली अकरा वर्षे भगिरथ यांचे वडील आमदार भारत भालके या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.

भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली ताकद या निवडणुकीत लावली होती. पण फडणवीस यांनी आमदार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्या माध्यमातून या निवडणुकीत अजित पवारांवर मात केली आहे. दरम्यान, आमदार प्रशांत परिचारक यांनी आपली संपूर्ण ताकद आवताडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी केल्यानेच हे शक्य झाले आहे. 

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूर मतदारसंघात ही पोटनिवडणूक लागली होती. त्यात भाजपने समाधान आवताडे यांना, तर राष्ट्रवादीने भारतनानांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. त्यात आवताडे यांनी भालके यांचा पराभव केला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आवताडे यांनी मताधिक्य घेतले होते. त्यात फेरीनिहाय कमी जास्त पणा होत होता. मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत भगिरथ भालके यांना आवताडे यांचे मताधिक्क्य गाठता आले नाही. मताधिक्य कमी जास्त होत असले  आवताडे यांनी 3716 मतांचे अधिक्य घेतही निवडणूक जिंकली.

या निवडणुकीसाठी भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर यांच्यासह दोन डझन आमदार आवताडे यांच्यासाठी मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, शिवसेनेचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदार यांनी भालके यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. पण खरा सामना हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच रंगला होता.

आमदार प्रशांत परिचारकांचा पाठिंबा ठरला निर्णायक

गेल्या दोन निवडणुकीत भाजपकडून परिचारक कुटुंबील सदस्याने निवडणूक लढवली होती. त्यात एकदा आमदार प्रशांत परिचारक, मागच्या २०१९च्या निवडणुकीत सुधाकरपंत परिचारक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दुसरीकडे समाधान आवताडे हे अपक्ष लढले होते. या निवडणुकांमध्ये त्यांचा सामना हा आमदार भारत भालके यांच्याशी झाला होता. या निवडणुकांमध्ये आवताडे आणि परिचारक यांची ताकद विभागली होती. त्याचा अचूक फायदा उवठत भालके यांनी निवडणुका जिंकल्या हेात्या. मात्र, यावेळी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आवताडे आणि परिचारक यांची मुंबईत बैठक घेत दोघांमध्ये समेट घडविला. त्यात परिचारकांनी आपली संपूर्ण ताकद आवताडे यांच्या पाठीशी उभी केली. दिलेल्या शब्दाला जागत त्यांनी पंढरपूर ताक्यातून निसटते का होईना पण आवताडे यांना मताधिक्य मिळवून दिले.

आमदार संजय शिंदेंना चपराक

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वाखरी येथील सभेत आमदार संजय शिंदे यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्याबाबत गौप्यस्फोट केला होता. समाधान आतवाडे यांना समाजवून सांगितले, पण ते काही ऐकनात. प्रशांतमालकांनी मला पाठिंबा दिला आहे. पण त्यांना कोठे माहित आहे की आमचे आणि प्रशांतमालकांचे काय ठरलं आहे ते. आवताडे यांना मतमोजणीनंतरच ते समजेल, असे व्यक्तव्य केले होते. त्यावर परिचारकांनी पलटवार करत संजय शिंदे यांनी ठरलेलं आतापर्यंत कधी पाळलं आहे, असा आरोप केला होता. मात्र, या सर्व घडामोडीत परिचारक यांनी संपूर्ण ताकद पणाला लावून समाधान आवातडे यांना निवडणून आणून संजय शिंदे यांना चपराक लगावल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com