एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पात होणार आरोग्य केंद्र : आव्हाड यांची घोषणा

स्वत: आव्हाड कोरोनाशी लढा देऊन बाहेर आले आहेत. कोरोनाच्या साथीच्या सुरुवातीच्या काळात विविध ठिकाणी फिरत असताना त्यांना अनेक अडचणी समोर असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी आता झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये आरोग्य केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
Jitendra Awhad Orders Health Centres in SRA Schemes
Jitendra Awhad Orders Health Centres in SRA Schemes

ठाणे : राज्यात यापुढे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) प्रत्येक प्रकल्पामध्ये एक हजार ते पाच हजार चौरस फुटाचे आरोग्य केंद्र उभारण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी येथे केली. 

राज्यात कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य शासन प्रत्येक पातळीवर लढत आहेत. मात्र, राज्यात न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यकाळात वैद्यकीय सेवांना मोठे महत्त्व राहणार आहे. आव्हाड यांनी आपल्या गृहनिर्माण खात्याच्या वतीने स्वतंत्र क्वारंटाईन यंत्रणा सुसज्ज केली आहे. ठाणे शहरातील मुंब्रा, कळवा किंवा मुंबईतील धारावी अशा मोठ्या वस्त्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. 

येत्या काही दिवसांमध्ये प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पामध्ये एक बालवाडी, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय आणि मनोरंजन केंद्रही फ्री ऑफ एफएसआय या तत्वावर सुरु करण्याचे आदेश डॉ. आव्हाड यांनी दिले आहेत. ही आरोग्य केंद्रे उभी राहिल्याने झोपडपट्टीतील नागरिकांना ते रहात असलेल्या ठिकाणीच चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत.

स्वत: आव्हाड कोरोनाशी लढा देऊन बाहेर आले आहेत. कोरोनाच्या साथीच्या सुरुवातीच्या काळात विविध ठिकाणी फिरत असताना त्यांना अनेक अडचणी समोर असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी आता झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये आरोग्य केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com