पंढरपुरात ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनात पहिलवानांनी जोर बैठका काढत मागितला दुधाला भाव 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. २१ जुलै) राज्यभर दुधाच्या दरासाठी आंदोलन करण्यात आले होते. या वेळेला स्वाभिमानीचे पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील कार्यकर्ते रणजित बागल यांच्या अभिनव कल्पनेतून पंढरपूर तहसीलदार कार्यालयासमोर एक आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले.
Wrestler participates in 'Swabhimani' movement in Pandharpur
Wrestler participates in 'Swabhimani' movement in Pandharpur

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. २१ जुलै) राज्यभर दुधाच्या दरासाठी आंदोलन करण्यात आले होते. या वेळेला स्वाभिमानीचे पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील कार्यकर्ते रणजित बागल यांच्या अभिनव कल्पनेतून पंढरपूर तहसीलदार कार्यालयासमोर एक आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी पहिलवान आणले होते. या पहिलवानांनी जोर-बैठका काढत दुधाला दर मागितला. कार्यकर्त्यांनी त्यांना दूध पाजले. आजवरच्या आंदोलनाच्या इतिहासात एका वेगळ्या आंदोलनाची नोंद यानिमित्ताने झाली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलनाची स्टाइल असते. आज त्याचा पुन्हा प्रत्यय आला. विदर्भामध्ये स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दुधाने अंघोळ करून आंदोलन केले. तर पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील स्वाभिमानीचे युवा कार्यकर्ते रणजित बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंढरपूर तहसीलदार कचेरीसमोर तालमीतील पहिलवान आणले.

या पहिलवानांना बैठक काढायला लावल्या. पहिलवान बैठक काढत होते आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते घोषणा देत होते. अशा प्रकारचे आंदोलन पहाण्यासाठी पंढरपूर येथे लोक जमा झाले. हळूहळू हे आंदोलन पाहून लोकही येथे आंदोलनात सहभागी झाले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलनाची चर्चा होत आहे. पहिलवानांना दूध पाजून व जोर बैठका व्यायाम करुन पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना दुधाचे वाटप करून आंदोलन करण्यात आले. 

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, संपर्क प्रमुख रायाप्पा हळणवर, तालीम संघाचे अध्यक्ष सोमनाथ सुर्वे, नानासाहेब चव्हाण, अतुल करंडे, पप्पू पाटील, रणजित बागल, विश्रांती ताई भुसनर, चंद्रकांत म्हस्के, सावता राक्षे, अतुल गायकवाड, अण्णा मोलणे, नितीन पाटील आदी स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते. 

ग्रामदैवताला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन 

दूधाला प्रतिलिटर ३० रुपये दर मिळावा, दूध पावडला ५० रुपये अनुदान द्यावे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज (ता. २१ जुलै) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध दर आंदोलन पुकारण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल आणि उपाध्यक्ष धनंजय पाटील यांच्या उपस्थितीत गादेगाव येथे ग्रामदैवत हनुमानाला दूधाचा अभिषेक करुन आंदोलन करण्यात आले. 

पंढरपूर तालुक्यातील उपरी, खेड भोसे, आंबे, चळे आदींसह अनेक गावांमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २१ जुलै) आंदोलन केले. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे आज तालुक्यातील सुमारे ४ लाखांहून अधिक लिटर दूधाचे संकलन बंद होते. 


Edited By :Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com