भाजपची मदत न घेण्याची भूमिका कलेक्‍टरनी कुणाच्या दबावाखाली घेतली? 

संकटाच्या काळात राजकीय वैरत्त्व जपताना किंवा माझ्यावर निष्क्रियतेचे बेफाम आरोप करताना आपण आपली कोल्हापूरची मैत्र संस्कृती विसरला, याचा खेद आहे. अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाला प्रतित्त्युर दिले
Under whose pressure did the collector take the role of not seeking help from BJP?
Under whose pressure did the collector take the role of not seeking help from BJP?

कोल्हापूर : संकटाच्या काळात राजकीय वैरत्त्व जपताना किंवा माझ्यावर निष्क्रियतेचे बेफाम आरोप करताना आपण आपली कोल्हापूरची मैत्र संस्कृती विसरला, याचा खेद आहे. अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाला प्रतित्त्युर दिले. तसेच, कोरोनाकाळात केलेल्या कामाचा लेखाजोखा या दोघांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे. 

"या हाताने दिलेले त्या हाताला कळू नये' अशी आपली संस्कृती. मी ही संस्कृती मानणारा. याच संस्कृतीत वाढलेला कार्यकर्ता आहे. कोरोनाच्या काळात मी कोल्हापूरकडे दुर्लक्ष केले, मी सुटीसाठी कोल्हापूरला येतो, कोल्हापूरला वाऱ्यावर सोडले, असे तुमचे आरोप मला दुःखी करून गेले. आपली राजकीय टिकाटिप्पणी मी खिलाडूवृत्तीने आजपर्यंत स्वीकारली. मात्र माझ्या सामाजिक उत्तरदायित्त्वावर आपण विना पुरावा, बिनबुडाचे आरोप केले, करत आहात, त्यामुळेच हे पत्र जाहीरपणे प्रसिद्ध करत असल्याचे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. 

मी केलेल्या आवाहनानंतर संवेदना फाउंडेशनने दोन लाख 36 हजाराचे एन-95 मास्क सीपीआरला दिले. तेज प्रतिष्ठानने पीपीई किट, विविध प्रभागात 25 हजार मास्क, 40 हजार सॅनिटायझर बाटल्या, शाळा, कार्यालये, सोसायटी येथे 300 तपमान मोजी मशिन्स, सॅनिटायझरचे 600 स्टॅंड टप्प्याटप्प्याने देऊ केले. हे करत असतना उथळ सामाजिक उपक्रम ही भावना आमची नव्हती. प्रसंगाचे गांभीर्य असल्याने आणि मदत करताना उत्कृष्ट दर्जा, व्यवस्थापन, वितरणला भाजपने महत्त्व दिले, असेही या पत्रात म्हटले आहे. 

आजही पाच हजार घरांमध्ये दिलेली डिजीटल थर्मामीटर असो किंवा घरपोच दिलेली चपाती-भाजी सेवा, ज्याची तुम्हाला कल्पनाही नाही. कारण, आम्ही हे कुणाला समाजावे, वाह व्वा मिळावावी यासाठी केलेले नाही. सुमारे 411 कुटुंबातील एका व्यक्तीला एक महिन्याची नोकरी ही संकल्पना राबवली, एवढेच नव्हे तर 500 रूपये पेट्रोलसाठी, एक महिन्याचे रेशन किट व पाच हजार रुपये पगार दिला. नाभिक समाजातील 1100 जणांना किट, 40 झोपडपट्ट्यामध्ये "खेळघर' द्वारे 850 विद्यार्थ्यांना रेशन किट अशी यादी मोठी आहे. कारण, आव्हानही मोठे आहे. संकट जाईपर्यंत ही मदत सुरू राहील, असे आश्‍वासनही पाटील यांनी दिले आहे. 

कोरोना संकट येताच मीच वृत्तपत्रातून सर्व पक्ष, संघटना, तालीम संस्था, यांना एकत्र येऊन व्यापक कृती आराखडा तयार करण्याचे आवाहन केले होते. ही गोष्ट मनावर न घेता त्याची खिल्ली उडवणारे कोण होते हो? प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना दबावापोटी भाजपची मदत घ्यायची नाही, ही भूमिका का घ्यावी लागली? असा सवालही पाटील यांनी या पत्रात विचारला आहे. 

पत्र लिहिताना मनाला वेदना होत आहेत 

राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना परस्परावर टीका, आरोप आक्षेप येत असतातच. खिलाडूवृत्तीने ही टीका, आरोप स्वीकारणे हा या क्षेत्रात स्वाभाविक स्वभाव बनून जातो. पण आज आपल्याला हे खुले पत्र लिहताना मला अत्यंत त्रास होत आहे, मनाला वेदना होत आहेत, कारण, तुम्ही माझ्यावर केवळ राजकीय स्वार्थापोटी निष्क्रियेतेचे आरोप केले आहेत, असे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. 

टिकेला हे तर्कसंगत उत्तर 

माझ्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले. लोकसहभागामुळे हा मदतीचा रथ पुढे जात आहे. शहरातील अनेक संस्थांना माझ्याकडून मदत सुरूच आहे. माझे पुस्तक समाधान, आनंद, सेवा यांनी भरलेले आहे. खरं तरं हा हिशेब नव्हे, कामाची यादी नव्हे ही माझ्या कोल्हापूरवरच्या प्रेमाची, अस्थेची, जबाबदारीची छोटीशी ओळख. व्यक्तिगत टिकेला दिलेले हे तर्कसंगत उत्तर, असेही पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com