आढळरावांचा मुख्यमंत्री ठाकरेंसाठी एक लाख व्हिडिओंचा सर्वपक्षीय 'व्हिडिओ-स्ट्रोक'

कोरोना विरोधातल्या लढाईत खंबीरपणे लढणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या धीरोदात्तपणाला १ मे महाराष्ट्र दिनी १ लाख व्हिडीओद्वारे पाठिंबा देण्याचा चंग बांधला असून त्यासाठी त्यांनी महाआघाडीसह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते-पदाधिकारी व कार्यकर्ते यांना व्हिडिओ समर्थन देण्याचे आवाहन केले आहे
Shivajirao Adhalrao Appeals All Parties to Support Uddhav Thackery Through Video
Shivajirao Adhalrao Appeals All Parties to Support Uddhav Thackery Through Video

शिक्रापूर : कोरोना विरोधातल्या लढाईत खंबीरपणे लढणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या धीरोदात्तपणाला १ मे महाराष्ट्र दिनी १ लाख व्हिडीओद्वारे पाठिंबा देण्याचा चंग बांधला असून त्यासाठी त्यांनी महाआघाडीसह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते-पदाधिकारी व कार्यकर्ते यांना व्हिडिओ समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. चला कोरोनाला हरवू या...! राष्ट्र आणि महाराष्ट्राला जिंकवु या..! या टॅगलाईनद्वारे हे आवाहन त्यांनी सर्व सोशल मिडिया माध्यमांद्वारे केले असल्याने यात आता राष्ट्रवादी आणि भाजपाचे कोण-कोण नेते-पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी होतात त्याची उत्सूकता आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत सध्या संपूर्ण देश लढत आहे. महाराष्ट्रात देखील वेळीच खबरदारी आणि उपाययोजना करीत मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या लढाईचा सामना धिरोदात्तपणाने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शांत, संयमी आणि धिरोदात्तपणामुळे हे युद्ध आता अंतिम टप्‍प्यात आले असल्याचा दावा माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी एका व्हिडिओद्वारे करीत ही लढाई आता संपूर्ण महाराष्ट्र जिंकणार असल्याचेही म्हटले आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी या अचानक उभ्या राहिलेल्या युद्धात महाराष्ट्रातील जनतेला आत्मविश्‍वास देत, युद्ध कायम ठेवले व आता ते अंतीम टप्प्यात आणले आहे. या लढाईत उद्धव ठाकरे यांची भूमिका निर्णायक असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने एव्हाना मान्य केलेले आहे. याच कारणाने आता पुणे जिल्ह्यातून व विशेषत: शिरुर लोकसभा मतदार संघातील सर्व पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे सर्वजण उद्याच्या एक मे महाराष्ट्र दिनी एक व्हिडीओ तयार करुन आपला पाठींबा राज्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना व्यक्त करतील, अशा भावनेने व अपेक्षेने आपण हे आवाहन केल्याचे श्री आढळराव यांनी सांगितले. 

दरम्यान या व्हिडिओमध्ये आय लव्ह महाराष्ट्र, वुई लव्ह महाराष्ट्र, आय लव वॉरिअर उद्धव साहेब, वी लव्ह वॉरिअर उद्धव साहेब, असे म्हणतानाचा व्हिडीओ एकट्याने, मित्र, मैत्रिण, मुले,मुली, आई वडील पत्नी आणि संपुर्ण कुटुंबीयांसह सोशल माध्यमांवर शेअर करायचे आवाहन आढळराव यांनी केले आहे. हे आवाहन त्यांनी फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ई-मेल आदी सर्व माध्यमातून शेअर करण्याबाबत सुचविले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ यायला सुरवात झाल्याचेही त्यांनी सांगितले.

.....यासाठी वळसे-पाटील करतीलच व्हिडिओ...!

दरम्यान राज्यात महाआघाडी असल्याने आपण आपले कट्टर राजकीय विरोधक राष्ट्रवादीचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना याबाबत आवाहन केले का, असे विचारले असता, मुख्यमंत्री महाआघाडीचे आहेत आणि महाराष्ट्राचेही. त्यामुळे उद्याच्या महाराष्ट्र दिनी वळसे-पाटील आणि राष्ट्रवादीचे तमाम पदाधिकारीही या अभियानात सहभागी होवून व्हिडिओद्वारे उध्दव साहेबांसाठी व्हिडिओ बनवून महाराष्ट्र एकसंध आहे याचा संदेश देतील अशी आपल्याला आशा आहे, असे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com